21 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. तसेच हा दिवस नाग देवाला समर्पित केला जातो. सर्प देव जो शिव आणि विष्णू दोघांनाही प्रिय आहे. अशातच या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरात गोडाचा पदार्थ आवडीने बनवता. चला तर मग जाणून घेऊया दूध आणि तांदळाची खीर कशी करायची….
साहित्य
- 1 वाटी तांदूळ
- 1 वाटी पाण
- 1 वाटी साखर
- 1/2 लीटर दूध
- काजू बदाम
- 1 टीस्पून वेलची
- 4 टीस्पून तुप
- चीमुटभर मीठ
- चारोळी
- किशमीश
- 1 वाटी ओल्या नारळाचा किस
कृती
- तांदूळ धुवून एक तास भिजवून बारीक वाटून घ्यावे.
- एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे त्यात चमचाभर तुप टाकावे.
- तुप विरघळल्यावर त्यात बारीक केलेले तांदूळ घालावे.
- तांदूळ घातल्यावर पाणी सारखे हलवावे म्हणजे तांदूळ शिजत आल्यावर गोळे होणार नाही व खाली लागणार ही नाही.
- तांदूळ पेस्ट शिजल्यावर त्यात दूध घालून हलवून घ्या.
- दूध घातल्यावर उकळी येऊ दयावी.
- उकळी आल्यावर त्यात काजू, बदाम, चारोळे, किशमीश, साखर, नारळाचा किस,विलायची पुड घालावी.
- हे सर्व चांगल्याप्रकारे हलवून घ्या.
- एक उकळी आल्यावर त्यात तुप घालावे व चीमुटभर मीठ घालून मंद आचेवर ठेवावे.
- गँस बंद करून खीर एका वाटीत घेऊन गरमागरम खाण्यासाठी तयार.
हेही वाचा :
काजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -