घरक्राइमकोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अखेर सुजित पाटकर यांना ईडीने उचलले; ठाकरे गटाला धक्का

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अखेर सुजित पाटकर यांना ईडीने उचलले; ठाकरे गटाला धक्का

Subscribe

मुंबईचे कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुजित पाटकर यांना अटक केली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मुंबई : राज्यातील राजकारणात उलथापालथी थांबण्याचे नांव घेत नसल्याचे चित्र असतानाच आता ठाकरे गटातील आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सुजित पाटकर यांना ईडीने आज अटक केली आहे. आजच्या दिवसभरातील मुंबईसह राज्यातील राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड असून, ईडीच्या या कारवाईनंतर शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Sujit Patkar finally picked up by ED in Kovid center scam case; A shock to the Thackeray group)

मुंबईचे कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुजित पाटकर यांना अटक केली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई कोविड सेंटर प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 36 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती.

- Advertisement -

कोविड काळात सुजित पाटकर आणि तीन भागीदार यांना कोविड जंबो सेंटरचे व्यवस्थापन चालवण्याचे कंत्राट मिळाले होते. खोट्या कागदपत्राच्या आधारे हे कंत्राट मिळवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विस या कंपनीविरुध्द, पाटकर आणि त्यांच्या तीन भागीदाराविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल केले होते. आझाद मैदान पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्हांच्या आधारावर या प्रकरणात झालेल्या मनी लॉड्रींगच्या दिशेने ईडी चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत होते.

हेही वाचा : बिल्किस बानो प्रकरण : 14 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या इतर कैद्यांना दिलासा का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल

- Advertisement -

सुजित पाटकर नेमके कोण?

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. याप्रकरणी ईडीने मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती. लाईफ सायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.

हेही वाचा : काय सांगताय, देशातील 52 लाख मोबाइल कनेक्शन बंद, तर 67 हजार सीम डिलर्स काळ्या यादीत

असा केला होता किरीट सोमय्यांनी आरोप

कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. ते म्हणाले होते की, शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -