Sunday, October 1, 2023
घर मानिनी Relationship नकार देण्यास संकोच वाटतो, मग वापरा या ट्रीक्स

नकार देण्यास संकोच वाटतो, मग वापरा या ट्रीक्स

Subscribe

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी प्रसंग येतो जेव्हा मनात इच्छा नसतानाही काही काम करावे लागते. केवळ समोरच्याला स्पष्ट नकार देता येत नाही म्हणून आपण ते काम करतो. पण त्या एका होकारामुळे नंतरही आपल्याला अशाच प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अशावेळी मन अस्थिर होते. मनावर ताण येतो. कारण समोरच्याला नाही बोलणं, एखाद्या गोष्टीस नकार देणं आपल्याला कठीण वाटतं. यामुळे अनिच्छेने काम करण्याची आणि नंतर मनस्ताप करत बसण्याची शृखंला कधीच संपत नाही.

- Advertisement -

पण तज्ज्ञांनुसार तुमच्या या स्वभावाचा तुम्हांलाच त्रास होऊ शकतो. तु्म्ही नकार देऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर घरातल्यांपासून बाहेरपर्यंत सगळेच तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्हाला गृहीत धरले जाऊ शकते. तुम्ही नाही बोलू शकत नाही हे लक्षात आल्याने तुमचा पार्टनरच नाही तर तुमची मुलेही तुम्हांला आवडणार नाही पटणार नाही हे माहित असूनही त्यांना जे हवं आहे तेच करतील. तुमच्या कामाच्या ठिकाणीही तुमचा असाच वापर केला जाईल. याचा तुम्हांला मानसिक त्रास होऊ शकतो.

मानवी स्वभावानुसार प्रत्येक व्यक्तीची आपल्या डोक्यात आणि मनात एक इमेज तयार झालेली असते. जसे की हा कंजूस आहे, भांडखोर आहे, तर तो बडबड्या आहे, तो बिनधास्त आहे तो घाबरा आहे तो हिरो आहे तो चुगलखोर आहे. ही इमेज एकाच भेटीत तयार होत नाही तर तुमच्या वारंवार होणाऱ्या वागणुकीतून तुम्ही कसे आहात हे तुम्हीच सांगत असता. यामुळे जर तुम्ही कोणाला नकार देऊ शकत नाही हे समजल्यानंतरच समोरचा माणूस तुमच्याशी कसं वागायचं ते ठरवून टाकतो.

- Advertisement -

जर वेळीच नकार दिला असता तर बरे झाले असते असे तुम्हाला प्रत्येकवेळी वाटत असेल तर त्यासाठी स्व:तला तयार करा.

सरळ नकार देणे अवघड वाटत असेल तर असे कारण सांगा की समोरचा तुम्हांला आग्रहच करू शकणार नाही.

समोरच्य़ाला खुश करण्यासाठी प्रत्येकेवळी नकार न देणे हा स्वभाव चांगला नाही. यातून समोरचा व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकतो.

तुमच्या होकारातून तो वाईट काम तुमच्याकडून करुन घेऊ शकतो.

जर नातेसंबंधातही तुम्ही हेच करत असाल समोरच्याला खुश करण्यासाठी त्याच्या प्रत्येक हो ला हो देत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण त्यात तुमची घुसमट होईल . नाते फार टिकणार नाही. त्यामुळे नाही बोलायला शिका.

कामाच्या ठिकाणीही स्पष्टवक्तेपणा ठेवा. जेणेकरून कोणीही तुमच्याकडून त्यांची कामे करुन घेणार नाही.

 

 

 

 

- Advertisment -

Manini