घरमहाराष्ट्रजेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा; ठाकरे गट-शिंदे गट आमने सामने

जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा; ठाकरे गट-शिंदे गट आमने सामने

Subscribe

रायगड जिल्ह्यातील स्थानिकांच्या रोजगारावरून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रायगडमधील ठाकरे गटाचे इतर प्रमुख पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होते.

रायगड : जिल्ह्यातील वडखळला नाका येथे असलेल्या जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीवर ठाकरे गटाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पदाधिकारी आणि स्थानिकांनी कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. तर यावेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याने दोन्ही गट आमने-सामने आले होते.

रायगड जिल्ह्यातील स्थानिकांच्या रोजगारावरून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रायगडमधील ठाकरे गटाचे इतर प्रमुख पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होते. याचदरम्यान शिंदे गट देखील ठाकरे गटाविरोधात येथे आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर ठाकरे गट- शिंदे गट येथे एकमेकांच्या समोर आल्याने वातारावरण चांगलेच तापले होते. यावेळी मोठा पोलिस फौज फाटा हा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करत होता. यावेळी ठाकरे गटाकडून जीएसडब्ल्यू (JSW) कंपनीवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचा स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हान दिलं तर स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि उत्तर रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी या आंदोलनाला विरोध केला. तर सत्तेत असताना ठाकरे गटाने जिंदाल कंपनीबरोबर व्यवहार सांभाळले आणि सत्ता गेल्यानंतर यांना रोजगाराची आठवण आली का? असा खडा सवाल उत्तर रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

माजी उद्योग मंत्री देसाई यांच्या नेतृत्वात मोर्चा

माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. तर रायगडमधील स्थानिकांच्या रोजगारावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी रायगडमधील ठाकरे गटाचे इतर प्रमुख पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होते.

हेही वाचा : ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगाच्या वाटेवर; शिंदे गटातील आमदाराचा दावा

- Advertisement -

घटनास्थळाला छावणीचे स्वरुप

ठाकरे गट आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चावेळी शिंदे गटातील शिवसैनिकही उपस्थित होते. दोन्ही गट आमने-सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.यावेळी घटनास्थळाला छावणीचे स्वरुप आले होते. तर काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पोलिसांशी बाचाबाची करत बॅरीकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोर्चेकरांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा : Mumbai Crime : चहापत्तीच्या पाकीटात घेऊन जात होता दीड कोटींचे हिरे; वाचा, कसा फसला त्याचा डाव

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

आम्ही तुम्हाला नोटीस देऊन आलो, आम्ही घुसखोर नाही, संमतीने आलो. मग तुम्हीच आम्हाला विरोध करण्यासाठी यांना इथे ठेवले का असे म्हणत माजी मंत्री सुभाष देसाई यांनी कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चूक झाली माफी मागतो असे म्हणताच माफी नको…माफी नको असे म्हणत शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तर आज काढलेला मोर्चा हा शांततेत होता तुम्ही जर स्थानिकांना डावलून बिहार, उडीशांचे लोक कामावर घेतले तर पुढील मोर्चा शांततेत नसणार असा इशाराही यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -