Monday, April 15, 2024
घरमानिनीRelationshipलग्नानंतर तुमचं नातं 'बोरिंग' झालंय?

लग्नानंतर तुमचं नातं ‘बोरिंग’ झालंय?

Subscribe

नात्याच्या सुरुवातीला सर्वच जोडपी एकमेकांच्या भावनांची काळजी घेतात. एकमेकांना मनसोक्त वेळ दिला जातो. मात्र, कालांतराने या भावना कमी होऊ लागतात. एका ठराविक वयानंतर दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि त्यामुळे नात्याला वेळ न देता आल्याने संवाद कमी होत जातो . आता तर या सगळ्यात भर पडत चालले ती आजकालच्या ९ ते ९ च्या रुटीनची. या सर्वाचा तुमच्या नात्यावर तर परिणाम होतोच पण तुम्हाला स्ट्रेसचाही सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या बाबतीतही असे काही घडत असेल आणि तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात पुन्हा रंग भरायचे असतील तर आमच्या या टिप्स जरूर फॉलो करा.

15 Common Mistakes That Lead to a Boring Relationship

- Advertisement -

प्रेम जुनं होऊ न देणे –
तुमचे कितीही बिझी शेड्युल असुद्या, असे मार्ग शोधून काढा ज्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कनेक्ट रहाल. एकमेकांसाठी जरी वेळ कमी असला तरी जेव्हा एकमेकांना वेळ द्याल तेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये कोणीलाही आणू नका . तसेच यावेळी फोन दूर ठेऊन एकमेकांवर लक्ष केंद्रित करा.

रुटीन तयार करा –
भले तुम्ही दिवसभर किती पण बिझी असुद्या तुमच्या नात्याचे रुटीन तयार करा. जसे की सकाळचा नाश्ता एकत्र करणे, मॉर्निंग वॉकला एकत्र जाणे. अशा गोष्टी केल्याने तुम्ही एकमेकांच्या जवळ राहाल.

- Advertisement -

How to Beat the 5 Types of Boredom that Arise in Relationships

टेक्नॉलॉजीपासून दूर राहा –
तुम्हाला एकमेकांसाठी जो काही वेळ मिळेल त्यात मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप दूर ठेवा. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक आणि मानसिकरित्या उपस्थित राहणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

मिनी ब्रेक आवश्यक-
जोडीदारासोबत हँग आउट करण्यासाठी थोडा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही एखादा वीकएंड प्लॅन करू शकता. किंवा लांब सुट्टीच्या दिवशी एक लहान सहलीची योजना करू शकता. यामुळे तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहाल.

झोपण्याआधी एकमेकांशी बोलून घ्या-
रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी बोला. तुमचा दिवस कसा होता आणि दिवसभर तुम्ही काय केलेत ते एकमेकांना सांगायला विसरू नका.

 


हेही वाचा ; अरेंज मॅरेज करताय? मग वाचा

- Advertisment -

Manini