Friday, May 17, 2024
घरमानिनीRelationshipपुरुषांच्या असतात एवढ्या personality

पुरुषांच्या असतात एवढ्या personality

Subscribe

रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या पार्टनरच्या अनेक गोष्टी नोटीस करते. अनेकदा महिलांना नात्यात आल्यानंतर पार्टनर चुकीचा निवडला तर नाही ना अशी शंका वाटू लागते. हे टाळण्यासाठी महिलांनी त्यांना नक्की कसा पार्टनर हवा आहे हे आधीच जाणणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी तुम्ही ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येणार आहात त्याचे व्यक्तिमत्त्व नक्की कसे आहे हे ओळखणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

असे म्हटले जाते की, आयुष्याचा जोडीदाराची निवड तुमचे आयुष्य घडवूही शकते आणि तोडूही शकते. लग्न लव्ह असु दे की अरेंज मुली सहसा मुलाच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाकडे आणि आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देतात. पण, आयुष्य सुंदर आणि समाधानी जगण्यासाठी पार्टनरचे बाह्य आणि अंतरव्यक्तिमत्व हे दोन्ही जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात पुरुषांच्या काही व्यक्तिमत्वाबद्दल ,

- Advertisement -

अल्फा पुरुष –
अल्फा पुरुष हे आकर्षक, मजबूत आणि नेतृत्व गुणी असतात. असे असले तरी अल्फा पुरुषांना बऱ्याचदा पुरुषांच्या गटात ‘वाईट मुलगा’ असे म्हटले जाते. कारण अशा पुरुषांना नात्यातील प्रत्त्येक गोष्टीवर नियंत्रण हवे असते.

- Advertisement -

बीटा पुरुष –
बीटा पुरुष लाजाळू, संकोची वृत्तीचे असतात. पण, स्वभावाने प्रामाणिक असतात. दिखाऊपणापासून अत्यंत दूर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘डाऊन टू अर्थ’ असतात. हे पुरुष स्वतःच्या आणि इतरांच्या सुखाची अधिक काळजी घेतात. ते बोलण्यात नेतृत्व करू शकत नाही पण चांगले श्रोते असतात.

गामा पुरुष –
ऊर्जेने भरलेल्या या पुरुषांना प्रवास करायला आणि आव्हानाचा सामना करायला आवडते. याशिवाय हे मित्र बनविण्यातही माहीर असतात.

डेल्टा पुरुष –
हे पुरुष टीम लीडर नाही तर टीम प्लेयर म्हणून उत्तम असतात. ज्याचा संपूर्ण टीमला फायदा होतो. नवीन गोष्टी शिकणे, स्वीकारणे, पुढे जाणे यावर त्यांचा अधिक विश्वास असतो. जर तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स कसे करायचे हे शिकायचे असेल तर हे पुरुष हे परफेक्ट उदाहरण आहे.

सिग्मा पुरुष –
अल्फा पुरुषांचे गुण हे सिग्मा पुरुषांमध्येही असतात. अशा पुरुषांना स्वतःसोबत इतरांना पुढे न्यायला आवडते. आपण त्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहू शकता. ते त्यांच्या अनुभवावरून शिकण्यावर अधिक विश्वास ठेवतात.

झेटा पुरुष –
बहुतेक कलाकार, लेखक पुरुष या गटातून येतात. हे पुरुष इतर कोणाचेही अनुकरण करणे टाळतात. पण, अनेकदा ट्रेडिशनल गोष्टी या गटातील पुरुषांना कंटाळवाणे वाटू शकतात.

ओमेगा पुरुष –
ओमेगा पुरुष स्वतःच्या कंपनीचा आनंद घेणारे असतात. त्यांना समाजकारणपेक्षा स्वतःसोबत वेळ घालविणे अधिक आवडते.

 


हेही वाचा : लव्ह मॅरेज का टिकत नाहीत?

- Advertisment -

Manini