Thursday, February 22, 2024
घरमानिनीRelationshipमहिलांचे 'हे' गुण पुरुषांना करतात आकर्षित

महिलांचे ‘हे’ गुण पुरुषांना करतात आकर्षित

Subscribe

सामान्यपणे पुरुषांना सुंदर, सडपातळ, गोऱ्या महिला आवडतात असंच सर्वांना वाटतं , पण खरंतर पुरुष महिलांच्या सौंदर्याकडे नाही तर वेगळ्याच गोष्टीकडे आकर्षित होतात. वेगवेगळ्या वयोगटातील पुरुषांना महिलांकडून काही खास अपेक्षा असतात आणि अशाच महिला त्यांना आवडतात एका विशिष्ट वयानंतर महिला आणि पुरुषांमध्ये मानसिक, भावनिक, वैचारिक तसंच शारीरिक बदल होत असतात. वाढत्या वयानुसार Maturity वाढत जाते. त्यामुळे केवळ दिसणं हा आकर्षणासाठी निकष राहत नाही. त्यामुळे वयपरत्वे पुरुषदेखील महिलांप्रमाणे प्रेम, विश्वास आणि सुरक्षेचा अधिक विचार करतात. एका विशिष्ट वयानंतर पुरुषांचं महिलांकडं आकर्षित होण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदललेला असतो. पुरुष नेमक्या कोण त्या महिलांकडं अधिक आकर्षित होतात, मुलांना काही तरुणी फक्त मैत्रीण म्हणून आवडतात. पत्नी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाहीत. बायको निवडताना मुलींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधणे मुलांना आवडते. कोणते आहेत ते गुण ज्याकडे पुरुष आकर्षित होतात.

आत्मविश्वास असलेली स्त्री
प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतोच असं नाही, त्यामुळेच आत्मविश्वासाने भरलेल्या मुली तरुणांना आवडतात. कारण त्यांना नातेसंबंध चांगले कसे जपायचे हे माहित असते. पत्नी समजूतदार असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं.

- Advertisement -

बिंदास जीवन जगणाऱ्या महिला
ज्या महिला किंवा मुली स्वतःची काळजी घेतात. धैर्याने एकाद्या गोष्टीचा विचार करतात. तसेच आपले विचार उघडपणे व्यक्त करतात. तसेच स्वतः मोठे निर्णय घेण्यास सक्षम आहेत, हे दाखवून देतात, अशा स्त्रिया या पुरुषांना खूप आवडतात आणि त्यांच्याशी ते मैत्री करण्यास प्राधान्य देतात.

स्वभाव बोलका आणि चेहरा नेहमी आनंदी
ज्यांचा स्वभाव बोलका आणि नेहमी आनंदी असणारा चेहरा पुरुषांना खूप भावतो. त्यांची गोष्ट एखाद्या लहान मुलासारखी हसवणारी आणि हास्यास्पद कृती दिसून येते, अशा स्त्रियांकडे पुरुष फार लवकर आकर्षित होतात. त्यांना नेहमी आनंदी असलेल्या उत्साही मुलींशी मैत्री करायची असते. तसेच त्यांना ती करायला आवडते.

- Advertisement -

कुटुंबाबाबत प्रेम
मुलांना कुटुंबाला समजून घेणाऱ्या आणि कुटुंबाची काळजी करणाऱ्या तरुणी अधिक आवडतात. मुलांना अशा मुलीशी लग्न करायचे असते जी नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेते आणि त्यांच्यावरही प्रेम करते.

कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेणारी
ज्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि ज्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात, त्या महिला किंवा स्त्रिया या सगळ्यांनाच आवडतात. अशा महिलांशी मैत्री करायला पुरुष मागेपुढे पाहत नाहीत. अशा महिला पुरुषांच्या आकर्षक यादीत आपोआप सामील होतात. पुरुषांना त्यांच्या सौंदर्यासोबत बुद्धी चातुर्य असलेल्या महिलाही आवडतात.

एकनिष्ठ
मुलांना नेहमी विश्वासार्ह मुलीशी लग्न करायचे असते. कारण आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे आजकाल प्रामाणिक राहणे फार कठीण आहे. त्यामुळे निष्ठावान मुलीशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो.

- Advertisment -

Manini