घरमहाराष्ट्रAshok Chavan: 'अशोक चव्हाणांना होती ईडीची भीती'; प्रणिती शिंदेंनी सांगितला त्यांचा प्लॅन

Ashok Chavan: ‘अशोक चव्हाणांना होती ईडीची भीती’; प्रणिती शिंदेंनी सांगितला त्यांचा प्लॅन

Subscribe

पक्षातून नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे. अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला, असा दावा असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून केला आहे. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी भाजपाव वापर करत आहे. भाजपा एकप्रकारे ब्लॅकमेल करत आहे, असा आरोप प्रणिती शिंदेंनी यांनी केला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, “नुकतेच काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ही अतिशिय दुर्दैवीबाब असून भाजपाचे हे षडयंत्र आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी वापर केला जातो. हा एक प्रकारे ब्लॅकमेल करण्यात येत आहे. यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून त्यांना स्वत:कडे वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न होत आहे. या त्रासपासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला, असा दावा प्रणिती शिंदेंनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही; सुशील कुमार शिंदे

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीवर सुशील कुमार शिंदे म्हणाले, “काँग्रेसमधून नेते जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इंडिया शाइनिंगच्या वेळी देखील सर्व जण पक्ष सोडून जात होते. त्यावेळी पक्षासोबत जे राहिले ते मोठ्या जिद्दीने लढले आणि आमचे सरकार आले. यावेळी देखील असेच काही तरी होईल, असा विश्वास सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसधीलच; ठाकरेंचं मोठं विधान

पुढील दोन दिवसांत माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला कारण असलचे पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन. तसेच, मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -