वीरता पुरस्कार मिळवणाऱ्या वायुसेनेतील पहिल्याच महिला अधिकारी ‘दीपिका मिश्रा’

वीरता पुरस्कार मिळवणाऱ्या वायुसेनेतील पहिल्याच महिला अधिकारी ‘दीपिका मिश्रा’

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. कार्यालयीन कामकाज असो किंवा देशाच्या संरक्षणासाठी लढायचे असो महिला ही त्यासाठी सज्ज होत आहे. अशातच विंग कमांडर दीपिका मिश्रा यांना गुरुवारी भारतीय वायुसेनेच्या वीरतेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. असा पुरस्कार मिळणाऱ्या त्या महिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

वायुसेनेच्या एका प्रवक्त्यांच्या मते, राजस्थान मधील दीपिका मिश्री यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील पुरस्थितीमध्ये मदत अभियान दरम्यान दाखवलेल्या साहसासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यांनी त्या परिस्थितीत पुरात बुडत असलेल्या ४७ लोकांचा जीव वाचवला होता.

खरंतर, २ ऑगस्ट २०२१ पासून दीपिका मिश्रा यांना मध्य प्रदेशात अचानक आलेल्या पुराच्या परिस्थितीत मदतीसाठी आणि आपत्कालीन मदत कामांसाठी तैनात केले होते. बिघडलेले वातावरण, वेगाने वाहणारे वारे आणि सुर्यास्त झाल्यानंतर ही विंग कमांडर दीपिका यांनी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. तसेच पुर आलेल्या ठिकाणी अशी कामगिरी करणाऱ्या त्या एकमेव साहसी महिला होत्या. त्या परिस्थितीत त्यांनी घेतलेले निर्णय हे भारतीय वायुसेना, एनडीआरएफ आणि नागरिक अधिकाऱ्यांद्वारे संपूर्ण बचाव अभियानाची योजना बनवण्यासाठी मदतशीर ठरले होते.

तर वायुसेनेचे प्रमुख एअऱर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी सुब्रत पार्कमध्ये वायुसेनेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात वायुसेनेच्या विविध अधिकाऱ्यांना युद्ध सेवा मेडल आणि पुरस्काराने गौरवले. प्रवक्त्यांनी असे सुद्धा म्हटले की, दोन अधिकाऱ्यांना युद्ध सेवा मेडल., १३ अधिकारी आणि एअर वॉरियरला वायुसेनेचे मेडल, १३ अधिकाऱ्यांना वायुसेना मेडल आणि ३० जणांना विशिश्ट सेवा मेडलने गौरवण्यात आले होते. त्यांनी असे ही म्हटले की, एकूण ५८ अवॉर्ड्स दिले गेले.


हेही वाचा: Diary- पित्याबरोबरची ती ठरली अखेरची भेट, नौदलात अग्नीवर झालेल्या हिशा बघेलची कहाणी

First Published on: April 21, 2023 11:37 AM
Exit mobile version