Corona Update: मुंबईत २४ तासांत १२४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

Corona Update: मुंबईत २४ तासांत १२४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

Mumbai Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत मुंबईत १ हजार २४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७६ हजार २९४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ४६१ झाला आहे. तसेच २४ तासांत ३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४३ हजार ५४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची रिकव्हरी रेट ५७ टक्के इतका आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

मुंबईत आज भर्ती झालेले संशयीत रुग्ण ७६३ असून एकूण आकडा ५२ हजार ७३५ आहे. तसेच सध्या २८ हजार २८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईत २७ जूनपर्यंत ३ लाख २४ हजार ६६६ कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर ४१ दिवसांचा आहे.

आज मुंबईतील धारावीत १७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार २६२वर पोहोचला असून आतापर्यंत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ५९८ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ६९ हजार ८८३वर पोहोचला असून मृतांचा आकडा ७ हजार ६१० झाला आहे.


हेही वाचा – राज्यात आज ५ हजार २५७ नवे रुग्ण; १८१ मृत्यूंची नोंद


 

First Published on: June 29, 2020 10:03 PM
Exit mobile version