राज्यात आज ५ हजार २५७ नवे रुग्ण; १८१ मृत्यूंची नोंद

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के

corona in maharashtra

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्यात आज ५ हजार २५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज १८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७८ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे. राज्यात आज २ हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८८ हजार ९६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के एवढं आहे.

राज्यात ५ हजार २५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार ८८३ झाली आहे. त्यापैकी ७३ हजार २९८ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ (१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७४ हजार ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.