…तर मुंबईवर पुन्हा होईल दहशतवादी हल्ला होईल

…तर मुंबईवर पुन्हा होईल दहशतवादी हल्ला होईल

(सौजन्य- इंडिया टीव्ही न्यूज)

२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्षे पूर्ण होतील. मूठभर आलेल्या अतिरेक्यांनी बेसावध मुंबईला असे काही जागे केले की त्यानंतर सुरक्षेसंदर्भात आपण हलगर्जीपणा करत आहोत ते समोर आले. आणि आता पुन्हा एकदा आपली सुरक्षा व्यवस्था कमजोर पडत असल्याचे समोर आले आहे. जर वेळीच आपण सुरक्षेसंदर्भात कठोर पावले उचलली नाही तर दहशतवादी हल्ला पुन्हा होण्याची भिती आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी व्यक्त केली आहे. सागरी मार्गाने या दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश केला. त्या सागरी मार्गाची सुरक्षा रामभरोसे! त्यांच्या निदर्शनास आले आहे. आताच जर सागरी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही तर मुंबईवर पुन्हा दहशतवादी ह्ल्ला होण्याची भिती शकील यांनी व्यक्त केली आहे.

वाचा- २६/११ च्या हल्ल्यावेळी पोलीसही घाबरलेले

कशा संदर्भात केला होता आरटीआय?

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस कार्यालयाकडे मुंबईतील सागरी सुरक्षेसंदर्भात माहिती मागितली होती. यात सुरक्षेसाठी नौकांची संख्या, नौका खरेदीच्या तारखा, दुरुस्तीसाठी गेलेल्या नौका आणि सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मनुष्यबळासंदर्भात माहिती अधिकारांर्गत माहिती मागितली होती. पहिल्यांदा ही माहिती देण्यास मुंबई पोलीस मोटार परीवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांनी पत्रकारांच्या मदतीने याची स्वत:च पाहणी करण्याचे ठरवले.

हे माहित आहे का? –कसाब कमी शिकलेला ‘धूर्त’ माणूस; २६/११ तपास अधिकारी महाले

पाहणीत काय आले समोर ?

२६/११ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी २३ नव्या कोऱ्या सागरी बोटी दाखल झाल्या. त्या आधी तट सुरक्षेसाठी ९ बोटी होत्या. म्हणजेच एकूण ३२ बोटी होत्यामुंबई पोलीस नौका विभाग, लकडा बंदर, माझंगाव, मुंबई या परीसरात असलेल्या गॅरेजमध्ये त्यांनी पाहणी केली असता त्यांना त्यातील १६ सागरी बोटी दुरुस्तीसाठी असलेल्या दिसल्या. म्हणजेच एकूण बोटींपैकी अर्ध्या बोटी सेवेत आहेत ही आश्चर्याची बाब असल्याचे शकील यांनी सांगितले.

हे ही वाचा –२६/११ मुंबई हल्ला: तपास अधिकारी महालेंनी अखेर कसाबला हरवले!

कर्मचाऱ्यांची संख्याही कमी

तर तट सुरक्षेसाठी एकूण ४६४ जणांचा स्टाफ मंजूर करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात १७२ कर्मचारीच नियुक्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिल्याची माहिती शकील शेख यांनी दिली आहे.

First Published on: November 24, 2018 12:46 PM
Exit mobile version