मैत्रिणीला वाचवण्याच्या नादात धावत्या लोकलमधून 2 मुलींनी घेतली उडी; पाहा व्हिडीओ

मैत्रिणीला वाचवण्याच्या नादात धावत्या लोकलमधून 2 मुलींनी घेतली उडी; पाहा व्हिडीओ

मैत्रिणीला वाचवण्याच्या नादात धावत्या लोकलमधून 2 मुलींनी घेतली उडी; पाहा व्हिडीओ

मुंबई लोकल ट्रेन प्रवासादरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील तीन मैत्रिणींची एक त्यांच्या जीवावर बेतली असती. लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी अनेकदा ट्रेनमध्ये चढतात किंवा चुकीचे ट्रेन पकडल्याचे समजताच उतरतात. मात्र चालती लोकल असताना असे केल्यास जीव गमवावा लागू शकतो. अशाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तीन मैत्रीणी एकामागोमाग ट्रेनमध्ये चढल्या आणि ट्रेन चालू होताच त्यांनी प्लॅटफॉर्म उड्या घेतल्या. त्यानंतर जे झाले ते पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेचा सीसीटीव्ह फुटेज आता समोर आला असून ते पाहून अनेकांची आश्चर्य व्यक्त केलेय. मुंबईच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे.

मुंबईत चालत्या ट्रेनमधून तीन मैत्रिणी उडी घेतली. यात पहिल्यांदा उडी घेणारी मुली ट्रॅकखाली जातेय की असे वाटत असताना घटनास्थळी उपस्थित एक होमगार्ड धावत आला आणि सेकंदात त्याने मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढले. सुदैवाने यात ती मुलगी बचावली आहे. या होमगार्डच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. मात्र तिच्या पाठोपाठ अजून दोन मुलींनी ट्रेनबाहेर उडी घेतली,

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसतेय की, लोकल ट्रेन काही वेळ स्ट्रेशनवर उभी राहिली आणि यावेळी घाईघाईने तीन मुली ट्रेनमध्ये चढल्या. यावेळी लोकल पुढच्या स्टेशनच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघाली, ट्रेनचा वेग वाढत असतानाच एका मुलीने ट्रेनमधून उडी मारली. यावेळी तोल गेल्याने ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या अगदी काठावर पडली, यावेळी सुदैवाने तिथे उपस्थिती होमगार्डने धाव घेत तिला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले. याचदरम्यान तिच्यानंतर तिच्या आणखी दोन मैत्रिणींनी देखील प्लॅटफॉर्मवर उड्या घेतल्याचे दिसतेय. यावेळी चालत्या ट्रेनमधून एकामागोमाग एक अशा तीन मुलींनी प्लॅटफॉर्मवर उड्या घेतल्या. दरम्यान यातील ट्रेनखाली जाणाऱ्या मुलीला सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) जवान अल्ताफ शेख यांनी वाचवले.

जवानाच्या या सतर्कतेबद्दल बईचे पोलीस आयुक्त (रेल्वे) कैसर खालिद यांनी त्यांचा सत्कार केला आहे. ट्विट करत कैसर खालिद यांनी लिहिलं की, ‘होमगार्ड अल्ताफ शेख यांनी 16/4/22 रोजी जोगेश्वरी स्टेशनवर उपनगरीय ट्रेनमध्ये चढताना पडलेल्या महिला प्रवाशाचा जीव वाचवला. त्यांच्या सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेसाठी त्यांना पुरस्कृत केले जात आहे.’ दरम्यान जवान अल्ताफ शेख यांच्या कृतीचे आता सर्वाच स्तरातून कौतुक होत आहे.


Weather Update : उकाड्यापासून सुटका नाहीच; दिल्लीसह ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

First Published on: April 26, 2022 12:07 PM
Exit mobile version