महापालिकेचे सहा उपायुक्त बनले सहआयुक्त

महापालिकेचे सहा उपायुक्त बनले सहआयुक्त

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या सहा अधिकाऱ्यांची निवड सह आयुक्तपदी झाली आहे. शासनाच्या निर्णयासापेक्ष सहा उपायुक्तांच्या गळ्यात सह आयुक्त पदाची माळ घालण्यात आली आहे. सामान्य प्रशासनाने बुधवारी याबाबतचे आदेश बजावत या सहा उपायुक्तांना यापुढे सह आयुक्त म्हणून संबोधले जावे, असे म्हटले आहे.

महापालिकेच्या सेवेत असलेल्या उपायुक्तांच्या संख्येच्या ३३.३३ टक्के पदांना, ज्यांनी पाच वर्षे सेवा बजावली आहे, अशांना सेवाज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी निश्चित करताना, त्यांना सहआयुक्त संबोधले जावे अशा प्रकारचा ठराव विधी समिती आणि महापालिका सभागृहात १२ फेब्रुवारी २०१८ला मंजूर करण्यात आला. त्यामुळे अशा प्रकारे उपायुक्त पदावर ५ वर्षे सेवा करणाऱ्या भारत मराठे, किरण आचरेकर, डॉ. किशोर क्षीरसागर, मिलिन सावंत, सुधीर नाईक आणि अशोक खैरे या सहा अधिकाऱ्यांना सह आयुक्त म्हणून संबोधण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे २२ फेब्रुवारी २०१८पासून हे कार्यलयीन आदेश लागू होतील असेही त्यात म्हटले आहे.

मुंबई मनपा सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेले परिपत्रक

महापालिकेत सहआयुक्त पदावर सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागली जायची. या पदावर विद्यमान आयुक्त अजोय मेहता, आर. राजीव यांच्यासह अनेक आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर विद्यमान निधी चौधरी याची सह आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु हे पद अस्तित्वात नसल्याचे सांगत उपायुक्त (विशेष) पदावर बोळवण करण्यात आली.


आणखी वाचा – रुग्णावाहिनींच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला

First Published on: December 13, 2018 1:09 PM
Exit mobile version