घरमुंबईरुग्णावाहिनींच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला

रुग्णावाहिनींच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला

Subscribe

दोन वर्षांच्या कालावधीसाठी १८ साध्या आणि ५ कार्डियाक रुग्णवाहिकांसाठी ९.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. परंतु याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला आहे.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांत साधी आणि हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिका खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर घेवून खासगीकरणाचा डाव घालणार्‍या प्रशासनाचा डाव पहारेकर्‍यांसह विरोधी पक्षांनी हाणून पाडला. खासगी संस्थांच्यावतीने सीएसआर निधी तसेच स्वयंसेवी संस्थांकडून रुग्णवाहिका उपलब्ध होत असताना भाडेतत्वावर रुग्णवाहिका घेवून कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा हा प्रस्ताव फेटाळत फेरविचारासाठी परत पाठवून लावला.

कंत्राटदारांच्या मदतीसाठी दिले जाते कंत्राट

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालय व इतर रुग्णालयांसाठी रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेता केईएम, नायर, शीव लोकमान्य टिळक, कुपर, बोरीवली कस्तुरबा, भायखळा कस्तुरबा, शिवडी क्षयरोग आणि जोगेश्वरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अशा आठ रुग्णालयांसाठी २३ रुग्णवाहिनी भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन वर्षांच्या कालावधीसाठी १८ साध्या आणि ५ कार्डियाक रुग्णवाहिकांसाठी ९.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. परंतु याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेत यापूर्वी कधीही रुग्णवाहिका आम्हाला दिसलेल्या नाहीत. कंत्राटदारांना मदत करण्यासाठी हे कंत्राट दिले जात आहे. त्याऐवजी पालिकेने स्वत: रुग्णवाहिकांची खरेदी करावी अशी सूचना रवी राजा यांनी केली. शीव रुग्णालयात सीएसआर निधीतून खासगी कंपनीच्यावतीने रुग्णावाहिका उपलब्ध करून दिली जात होती. परंतु त्यांना रुग्णवाहिका ठेवण्यास जागाच दिली जात नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

- Advertisement -

रुग्णवाहिका पुरेशा नाही

भाडेतत्वावर घेण्यात येणार्‍या २३ रुग्णवाहिका पुरेशा नाही. याऐवजी रुग्णालयांच्या आसपासच्या स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले तरीही अनेक संस्था पुढे येतील असे सांगत भाजपाचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी ज्या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होवू शकता, तिथे पैसे का मोजले जातात असा सवाल करत प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची सूचना मांडली. याला सपाचे रईस शेख यांनी पाठिंबा देत हा प्रस्ताव कंत्राटदारांसाठी आणल्याचा आरोप केला. १०८ च्या सेवेचा लाभ महापालिका घेईल असे आश्वासन तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिले होते. मग आता काय झाले असा सवाल त्यांनी केला.

कार्डियाक रुग्णवाहिकांचे झाले काय ?

अग्निशमन दलाच्यावतीने काही वर्षांपूर्वी कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यांचे काय झाले अशी विचारणा करत राष्ट्वादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी जेव्हा नगरसेवकांकडून मागणी केली जायची तेव्हा १०८क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत घेतली जाईल असे सांगण्यात यायचे. मग आता रुग्णवाहिकांची गरज कशी भासू लागली असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याच्या सूचना

महापालिकेच्या रुग्णवाहिका या आठ वर्षांपेक्षा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला असला २०१६मध्ये तत्कालिन अतिरिक्त आयुक्तांनी रुग्णवाहिका भाडेतत्वावरच घेण्यात याव्यात अशी सूचना केली होती. त्यांच्या आदेशानुसार दोन वर्षांकरता साध्या रुग्णवाहिका भाड्याने घेण्यात आल्या होत्या. त्यांचा कालावधी सप्टेंबर २०१८मध्ये संपला आहे. परंतु आता नव्याने निविदा मागवताना त्यात कार्डियाक रुग्णवाहिकांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रस्ताव फेटाळून लावला

२०१६ पर्यंत कार्डियाक रुग्णवाहिका महापालिकेच्या स्वत:च्या होत्या. परंतु त्या जुन्या झाल्यामुळे नवीन खरेदी न करता त्याही भाडेतत्वावर घेण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी समितीत दिली. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोटक यांनी सूचना मागे घेण्यास नकार दिल्यानंतर पहारेकर्‍यांनी विरोधी पक्षासह विरोधात मतदान करत प्रस्ताव फेटाळून लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -