वाढदिवशी आदित्य ठाकरे यांनी केले ‘हे’ वक्तव्य

वाढदिवशी आदित्य ठाकरे यांनी केले ‘हे’ वक्तव्य

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरें यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाय कॉलेज प्रवेश, १० वीची इंटर्नल परिक्षा गुण आणि पीक विमा या मुद्द्यावर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लढाई 

इंटर्नल गुणांमुळे राज्याचा निकाल कमी आला असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली. इंटर्नल गुणांमुळे राज्याचा निकाल कमी आलेला आहे. एसएससीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार की नाही हा प्रश्न आहे. इंटर्नल गुणांचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे ह्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा इंटर्नल गुण सुरु करण्यात यावे. तसंच एसएससी बोर्डासाठी कॉलेजमध्ये एक वेगळी तुकडी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात तसे आदेश देखील दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

पीकविमा योजनेमध्ये तांत्रिक अडचणी

दरम्यान, राज्यात दुष्काळाबाबत देखील आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुष्काळाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. दुष्काळी भागात फिरताना पीक विमा योजनांच्या अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले. दुष्काळासंदर्भात पीक विम्याच्या बाबतीत असलेल्या त्रुटी आम्ही काल मुख्यमंत्र्यांना समोर मांडल्या, असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणं टाळलं. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री पदासंदर्भातही बोलण्यास नकरा दिला. विधानसभा निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर देखील त्यांनी मौन पाळले.

First Published on: June 13, 2019 11:57 AM
Exit mobile version