भायखळ्यात गोळीबाराचा थरार; पोलिसांवरच झाडल्या गोळ्या

भायखळ्यात गोळीबाराचा थरार; पोलिसांवरच झाडल्या गोळ्या

मुंबईतल्या भायखळामध्ये पोलिसांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांना ८ ते १० अफ्रिकन व्यक्ती संशयित अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे जावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामधील एका आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन त्यांच्यावर एक राऊड फायरिंग केले. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या रक्षणासाठी दोन राऊड फायरिंग केले आणि तीन आरोपींना अटक केली. तर इतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळणाऱ्या इतर ७ आरोपींचा पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली.


अंमली पदार्थांच्या तस्करीत वृद्धांचा सहभाग


 

भायखळा पोलीस स्टेशच्या हद्दीमध्ये येणाऱ्या बिट क्रमांक – १चे कोबिंग ऑपरेशन गस्त करत असताना निर्मल पार्कजवळ पोलिसांना ८ ते १० अफ्रिकन नागरिक दिसले. त्याच्याकडे चौकशीसाठी गेले असता त्यांनी पोलिसांच्याच बंदुकिने पोलिसांवरच गोळीबार केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफिने या सर्व आरोपींचा पाठला करत त्यांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ५५० ग्रॅम एमडी, ११० ग्रॅम ब्राउन शुगर, ११ ग्रॅम कोकेन असा एकूण २१ लाख रुपयांचे आमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. तसंच एक रिव्हॉल्वर, ३ जिवंत काडतुस, १ चाकू, ११ मोबाईल आणि ४१ हजार रुपये देखील जप्त केले. या सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


गांजा तस्करी करणारा बुवा गजाआड


 

First Published on: December 15, 2018 6:32 PM
Exit mobile version