अनंत चतुर्दशीनंतर अमित ठाकरेंच्या पुढाकारे 13 समुद्र किनारे होणार चकाचक

अनंत चतुर्दशीनंतर अमित ठाकरेंच्या पुढाकारे 13 समुद्र किनारे होणार चकाचक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह कोकणात हजारो सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती गणेशमूर्तींचे भक्तीभावाने समुद्रात विसर्जन केले जाते. मात्र दुसऱ्या दिवशी या गणेशमूर्तींपैकी अनेक मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावरील वाळूत येऊन रुतून राहतात. अनंत चतुर्दशीनंतर दरवर्षी हेच दृष्य अनेक समुद्र किनारी पाहायला मिळते. त्यामुळे भक्तीभावाने ज्या गणरायाच्या मूर्तीची पूजा, सेवा केली त्याच मूर्तींचे भग्नावशेष असे इतस्ततः पाहून भाविकांमधून हळहळ व्यक्त केली जाते. हीच भावना ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच १० सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यातील एकूण 13 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या दोन तासांत मनसे आपले समुद्र किनारे आपली जबाबदारी ही मोहीम राबवत आहेत. ज्यात अमित ठाकरेंच्या पुढाकाराने राज्यातील 13 समुद्र किनारे चकाचक केले जाणार आहेत.

मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील 13 समुद्र किनाऱ्यांवर मनसेकडून ही स्वच्छता मोहित राबवली जात असून ज्यात मनसेचे शेकडो कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर राज्यभरातील अनेक मोठ्या गणपतींचे विसर्जन होते. मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर, रायगडर जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवी समुद्र किनारी हार फुलांसह जमा होणाऱ्या निर्माल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येते. हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवणार आहे. यासाठी स्वतः अमित ठाकरे दादर समुद्र किनाऱ्यावर जात स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेणार आहेत. तसेच मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून समुद्र किनाऱ्यांवरील वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य गोळा करून ते महापालिका प्रशासनाकडे सोपवले जाणार आहे.

राज्यातील समुद्रकिनारे वाचविण्यासाठी गेल्या वर्षी अमित ठाकरे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत 11 डिसेंबर 2021 रोजी अमित ठाकरेंच्या पुढाकाराने कोकण किनारपट्टीवरील 40 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यात आली. यानंतर अमित ठाकरे मनसेचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने दर महिन्याला मुंबईसह अनेक समुद्र किनाऱ्यांवर समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवत आहेत.


सर्वांनी आदर्श घ्यावा असे आदेश बांदेकरांच्या बाप्पाचं अनोखं विसर्जन


First Published on: September 9, 2022 2:00 PM
Exit mobile version