आज सचिन वाझे – अनिल देशमुख यांच्यात १० मिनिटे चर्चा, आयोगाने पोलिसांना खडसावले

आज सचिन वाझे – अनिल देशमुख यांच्यात १० मिनिटे चर्चा, आयोगाने पोलिसांना खडसावले

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीमुळे चांदीवाल आयोगाने मुंबई पोलिसांने खडे बोल सुनावले आहेत. या दोघांमध्ये सोमवारी एक तास चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे गृह विभागानेही नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज मंगळवारी या भेटीची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. पण आज चांदीवाल आयोगाने मुंबई पोलिसांच्या वागणुकीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाच्या चौकशीच्या निमित्ताने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्या दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Anil deshmukh sachin vaze meet for 10 minutes in chamber during chandiwal commission hearing)

परमबीर सिंह यांच्या वकिलांकडून याआधीच चांदीवाल आयोगासमोर हजर राहणार असल्याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार परमबीर सिंह हे सोमवारी चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. दरम्यानच्या काळात परमबीर सिंह आणि निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या भेटीच्या माहितीनंतरच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आला. मुंबई पोलिसांनीही या भेटीची चौकशी करणार असल्याचे म्हटले होते.

आयोगाने पोलिसांना खडसावले

आज मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंह हे पुन्हा हजर झाले. यावेळी मुंबई पोलिसांच्या कामावर आयोगाने नाराजी व्यक्त केली. सचिन वाझेला घेऊन येणाऱ्या पोलिसांना आयोगाने आज खडसावले. कोर्टाबाहेर जे घडेल त्याची जबाबदारी पोलिसांची असेल असेही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले.

सोमवारी परमबीर सिंह आणि वाझे भेटीनंतर आज अनिल देशमुख आणि वाझे हे एकाच दालनात आल्याची माहिती समोर आली. हे दोघेही एकाच खोलीमध्ये दहा मिनिटे असल्याची माहिती आली. अनिल देशमुखांचे वकील सचिन वाझेंची उलट तपासणी करणार आहेत. पण देशमुखांच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्यानेच कोर्टाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब झाले. त्यानंतर सचिन वाझे आणि अनिल देशमुख हे एकाच दालनात दहा मिनिटांसाठी भेटल्याची चर्चा आहे. त्यामुळेच काही मिनिटांपूर्वी आयोगाने पोलिसांना झापलेले असतानाच लगेचच या प्रसंगामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये झालेल्या भेटीच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांना किला कोर्टाचा दिलासा

परमबीर सिंग यांना किल्ला न्यायालयाने फरार घोषित (प्रोक्लेमेशन अबस्कॉन्डर) करून तसा आदेश काढण्यात आला होता. हा आदेश रद्द करून घेण्यासाठी परमबीर सिंग किल्ला कोर्टात दाखल झाले होते. .तसेच गोरेगाव खंडणी प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आल होते. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी गुन्हे शाखेसमोर चौकशीला हजेरी लावली होती आणि किला कोर्टात अर्ज केला. अनिल देशमुख यांनाही चांदीवाल आयोगाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केले होते. त्यानुसार अनिल देशमुख आज आयोगासमोर हजर झाले होते. दरम्यान किला कोर्टाने परमबीर सिंह यांना दिलासा देतानाच त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द केले.

आयोगाने जोडले हात 

परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीनंतर एस्कॉर्टच्या पोलिसांना अशा वागणुकीबाबत न्यायमूर्ती चांदीवाल खडसावले. आयोगाचे न्यायमूर्ती म्हणाले, की असे करू नका, माझ्या अशा सरळपणाचा गैरफायदा घेऊ नका, असे आयोगाने हात जोडून सांगितले. त्यानंतर वाजे यांनी हात जोडून पुढे असे होणार नाही, असे सांगितले.


परमबीर सिंह – वाझे भेटीमुळे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

First Published on: November 30, 2021 1:39 PM
Exit mobile version