हाफकिन संस्थेला कोवॅक्सिन लस बनवण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मोदींची मानले आभार

हाफकिन संस्थेला कोवॅक्सिन लस बनवण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मोदींची मानले आभार

corona vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, हाफकीनमध्ये वर्षाला २२.८ कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सिन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.’

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर कायम! पुन्हा ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद


 

First Published on: April 15, 2021 11:00 PM
Exit mobile version