सरकार बदलताच पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या; पालिका प्रशासनात संभ्रम

सरकार बदलताच पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या; पालिका प्रशासनात संभ्रम

राज्यात नवीन सरकार(maharashtra politics) आले की त्यानुसार प्रशासनात अनेक बदल होत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येताच पालिका प्रशासनात सुद्धा अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांच्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाकाच शिंदे – फडणवीस यांच्या नव्या सरकारने लावला आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेतील(BMC) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सतत होणाऱ्या बदल्या आणि कार्यपद्धतीमुळे मालिका प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सतत होणाऱ्या बदल्यांमुळे मुंबईतील अनेक प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

हे ही वाचा – पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता

एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री(cm eknath shinde) झाल्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के देत आहेत. मुंबई महानगर पालिकेतील आदित्य ठाकरे यांच्या मर्जीत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे – फडणवीस(shinde – fadanvis) सरकारकडून करण्यात आल्या आहेत. यासोबत शिंदेंनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे तो म्हणेज, धारावी मॉडेल जगप्रसिद्ध करणारे सहाय्यक आयुक्त किरण दीघवकारांची दोन महिन्यांपूर्वीच जी नॉर्थ वॉर्डमधून भायखळ्याच्या ई वॉर्डमध्ये बदली करण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा किरण दिघावकर यांची बदली मालाड मधील पी उत्तर या विभागात करण्यात आली आहे. तर दोन महिन्यांपूर्वीच बढाई होऊन आलेल्या उपयुक्तचंदा जाधव यांची बदली सुद्धा झोन एक मधून घनकचरा व्यवस्थापन या विभागात करण्यात आली.

हे ही वाचा – गणेशोत्सवात धोकादायक पुलांचे विध्न, मुंबई महापालिकेची माहिती

केवळ दोन महिन्यांमध्येच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने पालिका प्रशासन गोंधळून गेले आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या मर्जीत असलेल्या पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्याच्या चर्चा रंगत आहते. शिंदे आणि फडणवीस(shinde – fadanvis) यांचं नवीन सरकार स्थापन झाल्यापासून केवळ दोनच महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. या सगळ्याच परिणाम पालिकेतील(BMC) कामकाजावर झाला आहे. मुंबईतील अनेक कामांचा खोळंबा झाला आहे.

हे ही वाचा – दहीहंडीला रवी राणांचा मेगाप्लॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीही घेणार सहभाग

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी राज्यात विकास कामांचा धडाकाच लावल तर महाविकास आघाडी सरकारने त्यांचा कार्यकाळात जे निर्णय घेतले होते टाय सर्व निर्णयांना स्थागिती दिली. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले होते ते सर्व निर्णय खूप घाई गडबडीत घेतले होते त्या निर्णयांची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून म्हणून या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे असं शिंदे गटाने स्पष्ट केलं.

हे ही वाचा – सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक कोंडी

First Published on: August 18, 2022 10:39 AM
Exit mobile version