पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शिवाय आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शिवाय आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे विरोध पक्ष विविध आरोपांसह मागील काही दिवसांत पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना यांसह अनेक मुद्द्यांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या आधी विरोधकांचे पायऱ्यांवर ही आंदोलन होणार आहे. (maharashtra monsoon assembly session today second day on these issues opposition will be aggressive)

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी आणि जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, द्रौपती मुर्मू यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाष्य करताना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही त्यांनी टोला लगावला होता. त्यानंतर विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

याशिवाय, 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

17 ते 25 ॲागस्टपर्यंत अधिवेशन

  • 17 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.
  • या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे.
  • 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत.
  • 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 40 हून अधिक जखमी