ठाण्यातील व्यापार्‍यांना फसवणारा कथित ज्योतिषी जेरबंद

ठाण्यातील व्यापार्‍यांना फसवणारा कथित ज्योतिषी जेरबंद

व्यभिचारी सूनेचा सर्पदंश करुन सासूने काढला काटा

जेम्स ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारा नाशिकचा ज्योतिषी अखेर सात वर्षांनी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजेश भोयल उर्फ राजेश आचार्य (52 रा.आंबड,नाशिक ) असे या इसमाचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या बोगस जोतिष्याने ठाण्यातील व्यापारी स्नेहल उर्फ राजू चव्हाण आणि भागीदार प्रशांत डावखर व संजय नाईक यांची फसवणूक करून 2102 साली फसवणूक करून धूम ठोकली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी आचार्य हा ठाण्यातील बाजारपेठेतील प्रभात सिनेमा येथे सुवर्णस्पर्श जेम्स अँड ज्वेलरी या दुकानात ज्योतिषी होता. त्याच इमारतीत चव्हाण यांचा गारमेंट व्यवसाय होता. याच ओळखीतून आचार्य याने जेम्सच्या व्यवसायात अधिक नफा असल्याचे भासवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार जाने.2010 रोजी चव्हाण व भागीदार नाईक यांनी कळवा येथे भाड्याचे दुकान घेऊन लाखो रुपये गुंतवणूक केली. दरम्यान डावखर यांनीही आचार्य यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली होती. त्यानुसार 21 लाख 35 हजार रुपये घेऊन 2012 रोजी आचार्य पसार झाला होता. अखेर सात वर्षांनंतर कळवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांनी या आरोपीला नाशिकमधून जेरबंद केले.

First Published on: November 11, 2019 1:42 AM
Exit mobile version