वेबसीरिज शुटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना मारहाण

वेबसीरिज शुटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना मारहाण

'फिक्सर' वेबसीरिज शुटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना मारहाण

फिक्सरया वेबसीरिजच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना अज्ञात हल्लेखोरांनी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी घडल्याचे समोर आले आहे. मीरा रोड या ठिकाणी शुटिंग सुरु असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेत निर्माते साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. तसेच हल्ल्यावेळी पोलिसांनी गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे.

नेमके काय घडले?

तिग्मांशू धुलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साकेत सातव यांनी म्हटले आहे की, ‘मीरा रोड येथे शुटिंग करण्यासाठी आम्ही लोकेशन मॅनेजरला पैसे दिले होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शुटिंग करण्याची परवानगी देखील घेतली होती. दरम्यान, त्याठिकाणी मद्यपान करुन आलेले व्यक्ती सेटवर आले आणि त्यांनी राडा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर त्या व्यक्तींनी या ठिकाणी शुटिंग करण्यासाठी आम्हाला का विचारले नाही‘?, असा सवाल त्यांना सवाल करत काठ्यांनी आणि रॉडने मारहाण कऱण्यास सुरुवात केली.

काय म्हटले आहे या व्हिडिओत

शुटिंग सुरु असताना अज्ञात गुंडांनी कलाकारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर मलाही मारहाण केली आहे. त्‍यांनी आमचे काहीही ऐकून न घेताच आमच्या दिग्दर्शकाला, डीओपीला, कलाकारांना सगळ्यांना या मारहाण केली. एखाद्या जनावराला मारतात त्याप्रमाणे आम्‍हाला मारहाण करण्यात आली, असा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला आहे.

First Published on: June 20, 2019 10:42 AM
Exit mobile version