बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी फेरनिविदा नाहीच

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी फेरनिविदा नाहीच

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या शिवाजी पार्क परिसरातील कामासाठीची फेरनिविदा काढण्यात येणार नाही, असे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासामार्फत आहे त्या आराखड्यातच बदल करून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया पार पडणार नाही, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी स्पष्ट केले आहे.

निविदा प्रक्रियेसाठी बोली प्रक्रियेत अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रियेदरम्यान बोली लावण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा निविदा काढायची का याबाबतची चाचपणी सुरू होती. पण न्यासामार्फत आहे त्या आराखड्यातच बदल करावा अशी सूचना करण्यात आली आहे. आराखड्यात बदल केल्याने स्मारकाच्या बांधकामाची किंमत कमी होईल. त्यामुळे फेरनिविदा काढायची गरज भासणार नाही, असे मत समितीमार्फत नोंदविण्यात आले आहे.

मंजूर निधीमध्ये काम करण्याचे आव्हान

राज्य सरकारमार्फत बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.स्मारकासाठी मंजूर आराखड्यासाठी मंजूर झालेल्या निधीपेक्षा ३० टक्क्यांपासून ते ५६ टक्क्यांपर्यंत ही रक्कम दोन कंपन्यांकडून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंजूर निधीमध्ये स्मारकाचे काम करण्याचे आव्हान समितीसमोर आहे. स्मारकाचा नवा आराखडा आणि संपूर्ण स्मारकाची व्याप्ती ही आता न्यासामार्फत सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे एमएमआरडीएला सध्याच्या आराखड्यात नव्याने बदल झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणे शक्य होईल.

First Published on: January 11, 2020 3:44 AM
Exit mobile version