सोशल मिडिया एडिक्शन नही चोलबे !

सोशल मिडिया एडिक्शन नही चोलबे !

लग्नाचा जोडीदार म्हंटल की सर्वगुण संपन्न असावा अशी बेसिक अट असते. पण सध्याच्या ऑनलाईन काळातच लग्नासाठीची जाहिरात देण्याचा ट्रेंडही बदलेला आहे. एका बंगाली वकिलाने काळानुरूप अशी जाहिरात वृत्तपत्रात देतानाच एक नवा पायंडा घातला आहे. जोडीदाराने ऑनलाईन विश्वात रमण्यापेक्षा कौटुंबिक जीवनात लक्ष द्यावे म्हणून या बंगाली वकिलाच्या जाहिरातीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.

आपल्या लग्नाचा जोडीदार शोधताना एका बंगाली वकीलाने दिलेली जाहिरात अनेकांच्या भुवया उंचावणारी अशी आहे. दिवसेंदिवस बदलत्या लाईफस्टाईलमुळे वकीलानेही सगळ्यांचे लक्ष आकर्षित होईल अशा आशयाची जाहिरात दिलेली आहे. आपल्या साथीदाराच्या बाबतीत असलेल्या अटी शर्थींमध्ये वधू ही सोशल मिडिया एडिक्टेड नसावी अशी अट घातली आहे. त्यामुळे लग्नाची अट घालतानाच सोशल मिडियावर गुंतवले जाणारे तासन तास हे वाया जाऊ नये म्हणून ही अट घालण्यात आली आहे.

चॅटर्जी नावाच्या वकिलाने लग्नासाठी वधू हवी अशी जाहिरात देतानाच वधू ही उंच असावी, दिसायला देखणी असावी यासारखी अट सुरूवातीला घातली आहे. वराकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचेही जाहिरातीत नमुद करण्यात आले आहे. महत्वाच म्हणजे सोशल मिडियाला ही महिला एडिक्टेड नसावी अशी अट ठेवण्यात आली आहे. चॅटर्जी हे ३७ वर्षीय असून पेशाने वकील आहेत. सध्या ते उच्चा न्यायालयात प्रॅक्टीस करतात. त्यासोबतच ते योगा पॅक्टीश्नर आहेत. गोऱ्या रंगाचे आणि कोणतेही व्यसन नसलेले अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे. कमरपुकुर याठिकाणी त्यांचे घर असून घरात कारही आहे असेही त्यांनी जाहिरातीत नमुद केले आहे.

महत्वाचे म्हणजे ही जाहिरात सनदी अधिकाऱ्यांच्या चष्म्यातूनही सुटलेली नाही. वधू शोधण्यासाठी जाहिरात देण्यातल्या बदलता ट्रेंड अशीच टिप्पणी सनदी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सनदी अधिकारी असलेल्या नितीन सांगवान यांनी ही जाहिरात फोटो काढून ट्विटरवरून शेअर केला आहे. भावी वर / वधूंनी लक्ष द्या. लग्न करण्याचे निकष बदलत आहेत असे त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये नमुद केले आहे. त्यांच्या या ट्विटवरून नेटीजन्सच्या माध्यमातून आता टिवटिवाट सुरू झाला आहे.


 

First Published on: October 6, 2020 12:55 PM
Exit mobile version