मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकारी, बिल्डरांचे स्पेशल ऑडिट करा; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकारी, बिल्डरांचे स्पेशल ऑडिट करा; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिल्लीच्या नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवरील कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत टॉवर्सरच्या मुद्द्यावर बोट ठेनले आहे. किरीट सोमय्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईतील अनधिकृत इमारतींचे ऑडिट करत कारवाईची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बिल्डर आणि महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी यांचे विशेष ऑडिटची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत असे शेकडो टॉवर्स आहेत ज्यांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) ओसी मिळालेली नाही. पाच- पाच, दहा – दहा वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. मुंबईत असे अनेक टॉवर्स आहे ज्याचे वरचे दोन मजले चार मजले पाच मजले बिल्डर्सने अनधिकृतपणे बांधले आहेत. अजूनपर्यंत वापर परवाना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. 25 हजारांहून अधिक प्लॅट धारक ओसे नाही म्हणून चिंतेत आहेत. ते बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे स्पेशल ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई आणि एमएमआरआर आणि आसपासच्या परिसरात अशाप्रकारचे अनधिकृत टॉवर्स, अनधिकृत मजल्याचं ताबडतोब स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश द्या. महापालिकेचे भ्रष्ट बिल्डर आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 25 हजारांहून अधिक प्लॅट धारकांचे रक्षण करा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यावेळी प्रताप सरनाईक यांच्या विहंग इमारतीसंबंधीत आरोपांवर बोलताना सोमय्या म्हणाले की, मला कोणत्याही एका बिल्डरचं नाव घ्यायचं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की, 2010 मध्ये लोक राहायला गेले, पण 2022 पर्यंत ओसी मिळाली नव्हती. मी विषय उचलल्यानंतर दंड ठोठावण्यात आला होता, जो मागील सरकारने माफ केला. आता विहंग गार्डनच्या लोकांना ओसी मिळाली आहे.

दरम्यान मध्यमवर्गीय गाळेधारक आणि फ्लॅटधारक यांचे संरक्षण झाले पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन आहे. ठराविका बिल्डरला, फ्लॅटधारकांना माफी, असा भेदभाव करु नये, असही त्यांनी सांगितले आहे.


कर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाचा हास्यास्पद शोध; वीर सावरकर बुलबुल पक्ष्यावर बसून मायदेशी यायचे

First Published on: August 29, 2022 11:11 AM
Exit mobile version