घरदेश-विदेशकर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाचा हास्यास्पद शोध; वीर सावरकर बुलबुल पक्ष्यावर बसून मायदेशी यायचे

कर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाचा हास्यास्पद शोध; वीर सावरकर बुलबुल पक्ष्यावर बसून मायदेशी यायचे

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेले फलक लावण्यावरून कर्नाटकच्या शिवमोगामध्ये मोठा वाद उफाळून आला, एका गटाचे आक्षेपामुळे दुसरा गट भडकला आणि नव्या वादाला तोंड फुटले. हा वाद शांत होत नाही तोवर कर्नाटकात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील शालेय पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक हास्यास्पद विधान छापण्यात आले आहे.

सेक्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना वीर सावरकर बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे असं विधान कर्नाटक शालेय पाठ्यपुस्तकातील एका परिच्छेदात नमूद केले आहे. पाठ्यपुस्तकातील वीर सावरकरांबाबत केलेल्या या हास्यास्पद विधानाची आता सर्वत्र चर्चा आहे. विशेषत: सोशल मीडियावर याची बरीच चर्चा रंगतेय. यामुळे पाठ्यपुस्तकातील सावरकरांबाबतचे ते विधान दुरुस्त करत पुन्हा एकदा प्रकाशित करण्याची मागणी केली जात होती. ज्यानंतर अखेर शिक्षण विभागाने इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील हा धडा बदलला आहे.

- Advertisement -

रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एका समितीने हा धडा कानडी भाषेत पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला होता, मात्र ही समितीनंतर बरखास्त करण्यात आली. ‘ब्लड ग्रुप’ या मागील धड्याच्या जागी के.के.गट्टी यांच्या ‘कलावानू गेद्दावरू’ या धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. ज्यात वीर सावरकरांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमान सेल्युलर तुरुंगात लेखकाने दिलेल्या भेटीच्या प्रवास वर्णन करणारा हा धडा होता. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, सेल्युलर तुरुंगात वीर सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, परंतु त्यांच्या या कोठडीत एक बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकर त्याच्या पंखांवर बसून दररोज मायदेशी यायचे. ही कोठडी पूर्णपणे बंद होती, तरी देखील बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकारंना मातृभूमीचे दर्शन घडवायचा. असा उल्लेख केला होता. मात्र हा उल्लेख हास्यास्पद असल्याचे म्हणत पाठ्यपुस्तकातील धड्यातील वादग्रस्त परिच्छेदाचा फोटो व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची पाठ्यपुस्तक समितीकडे तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीची समितीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या धड्यातील एका परिच्छेदात सावकरांचा गौरव केल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला, दरम्यान हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी कर्नाटक टेक्सबुक सोसायटी (केटीबीएस)ला अनेक तोंडी तक्रारी आल्याची माहिती आहे. या घटनेवर आता शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री बी.सी. नागेश यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, सावकर हे महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा कितीही गौरव झाला तरी तो त्यांच्या त्यागासाठी पुरेसा नाही. लेखकाने त्या धड्यात जे वर्ण केले आहे ते अचूक आहे.


संभाजी ब्रिगेड आणि आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा! सामनातून विजयाचा निर्धार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -