चिकाटीला सलाम! अंध विद्यार्थिनीने बारावीला मिळवले ९० टक्के

चिकाटीला सलाम! अंध विद्यार्थिनीने बारावीला मिळवले ९० टक्के

चिकाटीला सलाम! संगणकावर परीक्षा देऊन अंध विद्यार्थिनीने मिळवले ९० टक्के

अंध विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून परीक्षा देण्यासाठी लेखनिक देण्यात येतो. परंतु, रुईया कॉलेजमधील सिमनर आनंद जोशी या अंध विद्यार्थिनीने कोणताही लेखनिक न घेता संगणकावर पेपर देत तब्बल ८९.९४ टक्के गुण मिळवले आहेत. सिमरनच्या यशाबद्दल कॉलेजकडून तिचा गौरव करण्यात आला असून, सर्व विद्यार्थ्यांमध्ये तीचे जास्त कौतुक होत आहे.

सिमरनने ‘अशी’ दिली परीक्षा

रुईया कॉलेजमध्ये आर्ट्समधून बारावीची परीक्षा दिलेली सिमरन जोशी ही अंध विद्यार्थिनी आहे. शिक्षण विभागाच्या नियमानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची व्यवस्था करण्यात येते. परंतु सिमरनने बारावीची परीक्षा देताना कोणत्याही प्रकारचा लेखनिक न वापरता स्वत: पेपर दिला. पेपर देण्यासाठी तिला मंडळाकडून संगणक देण्यात आला होता. सिमरनने परीक्षेसाठी वापरलेल्या संगणकावर स्क्रिन रिडिंग सॉफ्टवेअर होते. त्यामुळे सिमरन संगणकाच्या कि बोर्डवर जे काही टाईप करत होती. ते तिला ऐकायला येत होते. त्यामुळे ती टाईप करत असलेले उत्तर बरोबर आहे की चुकीचे, याची तिला कल्पना येत होती. यामुळे तिला पेपर लिहिणे सोपे झाले. संपूर्ण पेपर संगणकावर टाईप केल्यानंतर तिने त्याची प्रत काढून ती परिक्षा निरीक्षकांकडे दिली. त्यानंतर परीक्षा निरीक्षकांनी त्यावर बारकोड चिटकवून पेपर जमा करून घेतला. अशा प्रकारे कोणत्याही लेखनिकाची मदत न घेता संगणकाद्वारे परीक्षा देणारी सिमरन ही पहिली अंध विद्यार्थिनी ठरली. कोणाच्याही मदतीशिवाय सिमरनने दिलेल्या या परीक्षेत तिने मिळवलेले गुणही उल्लेखनीय आहेत.

संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण

सिमरनला संस्कृत विषयामध्ये ९४ गुण, सायकोलॉजीत ९४ गुण, इकोनॉमिक्स ९३ गुण, सोशोलॉजी ८२ गुण, इंग्रजी ८४ गुण आणि पॉलिटीकल सायन्स ८९ गुण असे तिला ८९.९४ गुण मिळाले आहेत. सिमरनच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच रुईया कॉलेजच्या प्राचार्य आणि प्रशासनाकडून तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on: May 28, 2019 8:37 PM
Exit mobile version