मालाड येथील प्रसिद्ध एमएम मिठाईच्या दुकानातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

मालाड येथील प्रसिद्ध एमएम मिठाईच्या दुकानातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

मुंबई  -: मालाड (पश्चिम) येथील प्रसिद्ध ‘एम.एम. मिठाईवाला’ या दुकानातील अनधिकृत बांधकामावर व शेजारील दुकानांमधील अनधिकृत बांधकामांवरही पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बुधवारी तोडक कारवाई केली.

त्यामुळे मालाड रेल्वे स्थानक, बाजारपेठ परिसरात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सदर परिसरातील अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडारवर आली असल्याने त्यावर पालिकेने कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.

मालाड ( पश्चिम) स्थानकाबाहेरील भागातील एम. एम. मिठाईवाला या दुकानात व बाजूच्या दिल्ली स्वीटस, मोबाईल दुकानातही अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. एम. एम. मिठाईचया दुकानातील अनधिकृत बांधकामामुळे रस्ते कामात अडथळा निर्माण होत होता आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसेच, या दुकानात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याबाबत तक्रार पालिकेच्या पी/उत्तर विभागाकडे पकरण्यात आली होती.

त्यामुळे या विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दुकानातील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, कार्यकारी अभियंता प्रवीण मलिक आणि उप अभियंता आनंद नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात, पालिकेचे सहा कामगार, एक जेसीबी यांच्या साहाय्याने दुकानातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.


राहुल गांधींना लग्नासाठी हवी अशी मुलगी; पहिल्यांदाच सांगितली मनातली गोष्ट

First Published on: December 28, 2022 10:11 PM
Exit mobile version