Navneet Ravi Rana Residence : राणा दाम्पत्याच्या राहत्या इमारतीची महापालिकेकडून अडीच तास झाडाझडती

Navneet Ravi Rana Residence : राणा दाम्पत्याच्या राहत्या इमारतीची महापालिकेकडून अडीच तास झाडाझडती

Navneet Ravi Rana Residence : राणा दाम्पत्याच्या राहत्या इमारतीची महापालिकेकडून अडीच तास झाडाझडती

सध्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत असलेल्या खा. नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील ‘लाव्ही’ या इमारतीमधील अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेच्या पथकाने भेट देऊन तब्बल अडीच तास झाडाझडती घेतली. आता तेथील अनधिकृत बांधकामाबाबत पालिका एक अहवाल तयार करणार असून त्यानुसार पुढे संबंधितांना नोटीस देणे व कारवाई करणे आदी प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. (BMC Investigate building Rana couple)

मातोश्रीमध्ये घुसून हनुमान चालीसा पठण करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवेसेनेशी पंगा घेणारे राणा दाम्पत्य हे प्रथम पालिकेच्या कारवाईमुळे अडचणीत आले. पालिकेने (BMC Investigate) त्यांच्या राहत्या इमारतीमधील फ्लॅटमधील काही बांधकाम अनधिकृत ठरवले होते. त्याबाबत राणा दाम्पत्याना पालिकेने नोटिसा बजावून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. नंतर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांना कारवाईबाबत न्यायलयाकडून काहीसा दिलासा मिळाला. (Rana Couple Residence)

मात्र ते राहत असलेल्या इमारतीमधील ८ फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची पालिकेला शंका आली. त्यामुळे पालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास या इमारतीला भेट देऊन पालिकेच्या पथकाने तब्बल अडीच तास झाडाझडती घेतली. यावेळी, पालिकेच्या पथकाने काही फोटो , व्हिडिओ शूटिंग काढले असल्याचे समजते. आता पुढील कारवाईबाबत पालिका अधिकारी एक अहवाल बनवणार आहेत. (bmc notice rana couple)

या अहवालानुसार अनधिकृत बांधकाम आढळून आलेल्या फ्लॅटधारकांना पालिका नोटिसा बजावणार आहे. त्यात, सदर फ्लॅटमधील जे काही अनधिकृत बांधकाम असेल ते फ्लॅटधारकांनी स्वतःहुन तोडावे अन्यथा पालिका आपली यंत्रणा घेऊन येईल व त्या त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीमधील फ्लॅट धारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.


UPSC Result 2021: UPSC मध्ये दिल्लीची श्रुती शर्मा टॉप, महाराष्ट्रातून कोणी मारली बाजी?

First Published on: May 30, 2022 7:55 PM
Exit mobile version