Navneet Rana : राणा दाम्पत्याला स्वागत रॅली भोवली, राणांसह शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

case filed against Navneet Rana ravi rana for welcome rally charged on more than 100 activists
Navneet Rana : राणा दाम्पत्याला स्वागत रॅली भोवली, राणांसह शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत हनुमान चालीसा पठणावरुन घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर नवनीत राणा आणि रवी राणा मुंबई-दिल्लीनंतर 36 दिवसांनी अमरावतीमध्ये परतले, यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले परंतु ही स्वागत रॅली राणा दाम्पत्याला भोवली आहे. रॅलीच्या आयोजकांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्या वादानंतर राणांच्या अमरावतीमध्ये अडचणी वाढल्या आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांचे अमरावतीमध्ये मोठ्या जल्लोषात आगमन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी स्वगतासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच त्यांच्यासाठी मोठा पुष्पहार करण्यात आला होता. यासाठी एक क्रेन वापरण्यात आली होती. तसेच रात्री दहा नंतर स्पीकर्स लावण्यात आले होते. परवानगी नसताना कार्यकर्त्यांनी स्पीकर्स सुरु ठेवले असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्याच्या घरासमोर असलेल्या रोडवर स्टेज उभारण्यात आला होता. रस्त्यावर अडथळा निर्माण केला होता. मध्यरात्रीपर्यंत स्पीकर्स लावून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. राजापेठ पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरुन 341, 188, 134, 135 कमल 15 पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यावर यापूर्वी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान अटकेमधून सुटका मिळाल्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली होती. दिल्लीतून अमरावतीमध्ये दाखल झाल्यामुळे समर्थकांनी स्वागत रॅली काढली होती.

सामाजिक कार्यक्रमाला परवानगी लागत नाही – रवी राणा

मोठ्या प्रमाणात रामायण वाचले जातात, हनुमान चालीसाचे पठण होत असते. त्या प्राचीन मंदिरात हनुमान चालीसाचे वाचन केले. ज्या मंदिरात 24 तास हनुमान चालीसा पठण केले जाते त्या ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा पठण केले आहे. त्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. आम्ही गुन्हा केला नाही. आमच्या घरी अनेक लोकांनी दुग्धाभिषेक केला आहे. घरगुती कार्यक्रमासाठी परवानगीची गरज नसते. मुद्दाम आमच्यावर गुन्हे दाखल करणं, आम्हाला रॅलीची परवानगी दिली नाही असे रवी राणा म्हणाले आहेत.


हेही वाचा : सुप्रिया सुळेंना घरी जा, स्वयंपाक करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माफिनामा, पत्रातून दिलगिरी व्यक्त