UPSC Result 2021: UPSC मध्ये दिल्लीची श्रुती शर्मा टॉप, महाराष्ट्रातून कोणी मारली बाजी?

श्रुती शर्मा हिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे शर्मा हिच्यासह एकूण 23 उमेदवार जामिया आरसीएमधून केंद्रीय लोकसेवा परीक्षेत पात्र झाले आहेत.

upsc civil service final result 2021 shruti sharma got air 1 know profile check topper list maharashtra 40 student
UPSC Result 2021: UPSC मध्ये दिल्लीची श्रुती शर्मा टॉप, महाराष्ट्रातून कोणी मारली बाजी?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यंदा यूपीएससी 2021 परीक्षेत पहिल्या चार स्थानांवर मुलींनीच बाजी मारली आहे. यात श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र पहिला क्रमांक पटकवणारी श्रुती शर्मा हिचे विशेष कौतुक होत आहे. (Upsc Toppers 2021)  दरम्यान महाराष्ट्रातूनही 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश मिळवले आहे.  त्यामुळे श्रुती शर्मा नेमकी कोण आहे आणि महाराष्ट्रातील किती विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले ते पाहू…  (UPSC Result)

देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत मुलींनीच हॅट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा ही परीक्षेत अव्वल ठरली, यानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र पहिल्या क्रमांक पटकावणाऱ्या श्रुती यांचे देशभरातून विशेष कौतुक होते. तर त्यांच्या एकूण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेण्याचीही अनेकांना इच्छा झाली आहे. (Upsc Civil Services Result 2021)

श्रुती शर्माचा जीवन प्रवास नेमका कसा होतो? 

श्रुती शर्मा ही मुळची उत्तर प्रदेशातील बिजनौरची रहिवासी आहे. (Shruti Sharma Upsc) तिने संपूर्ण शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. यानंतर श्रुती शर्माने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश घेतला होता. श्रुती शर्मा ही आता अवघ्या 26 वर्षांची आहे. यानंतर श्रुती शर्मा हिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे शर्मा हिच्यासह एकूण 23 उमेदवार जामिया आरसीएमधून केंद्रीय लोकसेवा परीक्षेत पात्र झाले आहेत.

श्रुतीच्या या उतुंग यशावर तिच्या कुटुंबांनी प्रतिक्रिया दिली की, गेल्या 10 महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर UPSC परीक्षेत ती भारतात प्रथम आली. त्यांचे वडील के. एन, शर्मा हे पेशाने एक डॉक्टर आहे. तर आई संतोष शर्मा पेशाने एका शाळेत शिक्षिका आहेत. श्रुतीच्या उत्तुंग यशामागे पालकांचा पाठिंबा, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि कठोर परिश्रम अशी अनेक कारणे आहेत. दरम्यान श्रुती शर्माने टॉपर झाल्यानंतर तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीला दिले आणि सांगितले की, जर मी येथे नसते तर कदाचित मी टॉप आली नसती. (UPSC Maharashtra Candidates)

या यशानंतर पहिली प्रतिक्रिया देताना श्रुती म्हणाली की, “यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विश्वास होता, परंतु गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळणे आश्चर्यकारक आहे.” श्रुती शर्मा यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे.

महाराष्ट्रातील 47 उमेदवारांनी UPSC च्या परीक्षेत यश

दरम्यान या निकालात महाराष्ट्रातील 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 47 उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. यात मुंबईच्या प्रियंवदाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तेरावे स्थान मिळाले आहे. तर राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. आदित्य काकडे १२९ वा क्रमांक मिळवला आहे. यासोबत शुभम भोसले १४९ वा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील टॉप फोरचा विचार केल्यास प्रियंवदा म्हाद्दळकर ही महाराष्ट्रीतील टॉपची उमेदवार आहे. त्यापोठापाठ दुसऱ्या क्रमांकावर शुभम भिसारे, तिसऱ्या क्रमांकावर आदित्य काकडे आणि चौथ्या क्रमांकावर शुभम भोसले याचे नाव घेतले जाते. (Upsc Toppers 2021 Maharashtra)

दरम्यान महाराष्ट्रातील नागपूरमधून 2021 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. नागपूरमधील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी सुमित रामटेके याने ३५८ वा रॅंक मिळविला आहे. तर लातूरमधील औसा येथील शुभम संजय भोसले यानेही यश मिळवले आहे. हा विद्यार्थी देशात १४९ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे.


UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली