मॉडेलचा लैंगिक छळ करणाऱ्या व्यवसायिकाला अटक

मॉडेलचा लैंगिक छळ करणाऱ्या व्यवसायिकाला अटक

निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसा न दिल्याने भाजप नगरसेविकडून सुनेचा छळ

अभिनेत्रीचा लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी अंधेरीत राहणाऱ्या एका व्यवसायिकास ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या व्यवसायिकाचे नाव अमित अग्रवाल असून त्याचे वय ३५ वर्ष आहे. मॉडेल अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी या अमित अग्रवाल व्यवसायिकास १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या वेळी दोघांची ओळख

ही पीडित तरूणी उत्तर प्रदेश येथील असून एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आली होती. त्या कार्यक्रमाच्या दरम्यान तिची ओळख अमितबरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली व ते लिव्ह इन मध्ये राहू लागले. २०१७ साली अमितच्या मोबाईलमध्ये तिला त्या दोघांचा एक एमएमएस दिसला. तो बघून तिला धक्का बसला. यामुळे अमितचे तिच्याशी पटेनासे झाले. या अमितच्या वागण्याने दोघांतील वाद वाढू लागले.

धमकावत लैंगिक अत्याचार

या वादात अमित तिला मारहाण करू लागला. इतकेच नाही तर त्याच्याजवळील एमएमएस घरातल्या माणसांना दाखवेल, अशी धमकी तो देऊ लागला. यामुळे रोज होणाऱ्या या त्रासाला कंटाळल्याने पीडित आपल्या घरी उत्तर प्रदेशमध्ये निघून गेली. तिथे तिचा एका वकीलाबरोबर साखरपुडाही झाला. त्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली. मुंबईत परतल्यानंतर अमित तिला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

First Published on: April 22, 2019 3:18 PM
Exit mobile version