केडीएमसीत घंटागाडी कामगारांचे चक्काजाम आंदोलन

केडीएमसीत घंटागाडी कामगारांचे चक्काजाम आंदोलन

केडीएमसीत घंटागाडी कामगारांचे चक्काजाम आंदोलन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी घंटागाडी कामगारांना मागील तीन महिन्यांचा पगार थकवण्यात आला आहे. मागील ३ महिन्यांपासून कामचा मोबदला मिळत नसल्यामुळे संतप्त कामगारांनी आज कामबंद आंदोलन पुकारले होते. पगार मिळत नसल्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी कामगारांनी थेट महापालिका मुख्यालयाकडे मोर्चा वळवला होता. घंटागाडी कामगारांच्या या आंदोलनाला शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गायकवाड यांनी कामगारांच्या शिष्टमंडळासह प्रशासनाची भेट घेत कामगारांचा थकित पगार केव्हा मिळणार याची विचारणा केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून तांत्रिक अडचणींचे कारण देत लवकरच कामगारांचा पगार करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. घंटागाडीवर काम करणारे कामगाह हे विशाल एक्सपर्ट या कंपनीकडे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. शहरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट विशाल एक्सपर्ट या कंपनीने घेतले आहे. कंत्राटी कंपनीने कामाचे बिल महापालिकेत सादर केल्यावर बिल मंजूर होण्यास बराच विलंब केला जातो. यामुळे घंटागाडी कामगारांचे पगार थकवले जातात.

मागील चार महिन्यांपासून पगार थकित असल्यामुळे संतप्त कामगारांनी ४ तास कांमबंद आंदोलन केले. कामगारांनी थेट मुख्यालयावर आंदोलन केले. मुख्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. कोरोना काळात जीवावर उदार होऊन घंटागाडी कामगारांनी कचरा उचलण्याचे काम केले आहे. कोरोना संकटातही या कामगारांनी काम केले. या कामगारांचा पगार थकविणे किती योग्य आहे. असा प्रश्न नगरसेवक गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेत कायमस्वरुपी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला जातो. त्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतनही लागू करण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारात सफाई कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिला जाणार आहेत. परंतु कंत्राटी कामगारांचे पगार थकविला जात आहे. हा प्रशासनाचा भेदभाव असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

First Published on: January 20, 2021 7:56 PM
Exit mobile version