तर विधान भवनात तोंड उघडू देणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तर विधान भवनात तोंड उघडू देणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

"इम्पेरिकल डेटा" इंग्रजी शब्द असल्यामुळे फरक कळाला नसावा, चंद्रकांत पाटील यांचा टोला

पूजा चव्हाण प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ करत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात सत्य समोर यावे यासाठी चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे. परंतु चित्रा वाघ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता त्यांच्या अडचणी वाढवत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही तसचे सरकारला बाकीचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. किशोर वाघ यांच्यावर कारवाई करुन चित्रा वाघ यांना त्रास दिला जात आहे. कारवाई करुन धमकी देऊन आवाज दाबता येणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे कारवाई करत त्यांना अडणीत टाकण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केले जात आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

अनेक गुन्हे दाखल झाले असून सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही पूजा चव्हाण प्रकरणात काही बोलत नाही आहेत. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर वानवडीच्या रुग्णालयात नेले, त्या रुग्णालयात १५० कॅमेरे आहेत त्याचे फुटेज कुठे आहेत? तर पूजाने आत्महत्या केली त्या घटनास्थळावरील दोघो कुठे आहेत. ते कुठे गेले गायब झाले जर ते गायब झाले आहेत. तर त्यांच्या गायब होण्यामागे कोणाचा हात आहे. असे अनेक प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

पूजा चव्हाणची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत. ते कुठे बेपत्ता झाले आहेत. नांदेडच्या रुग्णालयात तिचा गर्भपात न करता तिचा गर्भपात यवतमाळमध्ये कसा झाला असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. या क्लिप्सची फॉरेन्सिक चाचणी केली आहे का? केंद्राच्या महिला आयोगानेही रिपोर्ट मागितला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांना याच वेळी कशी कारवाई करता असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, पूजा धनंजय मुंडे यांच्याविरोधात कारवाई केली नाही, एका मंत्र्याच्या जायवायाला ड्रग्ज प्रकरणात अटक केली त्याची कारवाई केली नाही तर एक मंत्री घरी घेऊन जाऊन मारहाण करतो त्यावरही कारवाई करणार नाही. एका पक्षाच्या युवक अध्यक्षाने मुलीवर बलात्कार केला ती मुलगी टाहो फोडत सांगते यानेच बलात्कार केला आहे. तरी त्यावर तुम्ही कारवाई करत नाही. पण पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्याविरोधात कारवाई करत आहेत.


हेही वाचा : चित्रा वाघ ची वाघीण का बनली?


चित्रा वाघ यांच्या नवऱ्यावर कारवाई करण्याची आणि भीती दाखवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु चौकशी करण्याची भीती दाखवून तुम्ही चित्रा वाघ यांना गप्प करु शकणार नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या महिला मोर्चाने १०० ठिकाणी निदर्शने केली आहेत. सोमवारी युवा मोर्चाच्या वतीने १०० ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच बुधवारी ओबीसी आघाडीच्या वतीने १०० ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

निर्दोष असल्यास त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घ्या

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, कारवाईनंतर निर्दोष असल्यास पुन्हा मंत्रीपद द्या परंतु सोमवारच्या आत जर वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी सोमवारच्या आधी जर निवेधन देताना संजय राठोड यांच्यावर कारवाईबाबत काही सांगितले नाही. तर भाजप या विषयावर तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधानसभेत तोंड उघडू देणार नाही. सातत्याने गोंधळ घालून सरकारला तोंड उघडू देणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

First Published on: February 27, 2021 3:44 PM
Exit mobile version