आम्ही विरोधकांना ‘गॅंग ऑफ वासेपुर’ म्हणायचे का ? – मुख्यमंत्री

आम्ही विरोधकांना ‘गॅंग ऑफ वासेपुर’ म्हणायचे का ? – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांनी सरकारला ‘ठग’ असे म्हणत युतीच्या सरकारने कसे चार वर्षांत सर्वसामान्यांना ठगवले, अशी बॅनरबाजी करत ‘ठग्स ऑफ महाराष्ट्र’चे टायटल देत ठगबाजीची चार वर्षे दाखवली आहेत. त्यावरून सत्ताधारीही चांगलेच आक्रमक झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जशासतसे उत्तर दिले आहे. विरोधकांकडे काहीही बोलण्यासारखे नाही, त्यामुळे ते असे बालिश वागत आहेत. तसेच ‘ठग्स ऑफ महाराष्ट्र’ म्हणने हा विरोधकांचा पोरकटपणा असल्याचे सांगत मग आम्ही विरोधकांना ‘गँग ऑफ वासेपुर’ म्हणायचे का?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला आहे.

वाचा : सत्ताधारी ठग्स ऑफ महाराष्ट्र; विरोधकांनी उडवली खिल्ली

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका

यावर्षी फक्त ७४ टक्के इतकाच पाऊस पडला असून काही ठिकाणी तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मात्र आम्ही सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर केला. विशेष म्हणजे जे १५१ तालुके दुष्काळ म्हणून घोषित केले, ते केंद्राच्या निकषात बसणारे आहेत आणि आम्ही यासाठी केंद्राला साडे सात हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला असून उपाय योजनांचेही भाग पाडले आहेत. दुष्काळग्रस्त भागात आधी डिसेंबर महिन्यात टँकरने पाणी देणार. त्यानंतर डिसेंबर ते मार्च आणि नंतर मार्च ते पाऊस पडेपर्यंत पाणी देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. विरोधकांनी फक्त राजकारण करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा मोलाच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

वाचा : तोपर्यंत मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही – रामदास आठवले

अधिवेशनात नवीन १३ विधेयके

बऱ्याच वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन हे मुबंईत होत असून हिवाळी अधिवेशनात नवीन १४ विधेयकं मांडणार असून प्रलंबित १० विधेयकंदेखील मंजूर होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच दुष्काळ या विषयावरही यंदाच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

वाचा : मराठा समाजाला एससी-बीसी प्रवर्गात आरक्षण – मुख्यमंत्री

First Published on: November 18, 2018 7:51 PM
Exit mobile version