घरमहाराष्ट्रसत्ताधारी ठग्स ऑफ महाराष्ट्र; विरोधकांनी उडवली खिल्ली

सत्ताधारी ठग्स ऑफ महाराष्ट्र; विरोधकांनी उडवली खिल्ली

Subscribe

विरोधकांनी सरकारला ठग्स ऑफ महाराष्ट्र असं म्हणत हिवाळी अधिवेशन वादळी होणार याची प्रचिती दिली आहे. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ठग्स ऑफ महाराष्ट्रचे बॅनर लावत सरकारवर बॅनर अस्त्र चालवले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर आता विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना – भाजपवर बॅनरच्या माध्यमातून कडाडून हल्ला केला आहे. विरोधकांनी सरकारला ठग ऑफ महाराष्ट्र असं म्हणत हिवाळी अधिवेशन वादळी होणार याची प्रचिती दिली आहे. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ठग्स ऑफ महाराष्ट्रचे बॅनर लावत सरकारवर बॅनर अस्त्र चालवले. या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.

BJP – Shivsena Government are Thugs of Maharashtra: Opposition shows banner

आमिर खान, अमिताभ बच्चनचा ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाला असला तरी विरोधकांनी युती सरकारवर टीका करण्यासाठी "ठग ऑफ महाराष्ट्र" ही प्रतिकात्मक फलकबाजी सुरु केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही फलकबाजी केली असून आज त्याचे प्रदर्शन भरवले आहे.

Posted by My Mahanagar on Sunday, 18 November 2018

- Advertisement -

विरोधकानी बॅनरमधून दाखवली सरकारची ठगबाजीची चार वर्षे

आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा ठग्स ऑफ हिंदोस्थान हा सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी त्याची चर्चा मात्र आता अधिवेशनाच्या आधी चर्चिली जात आहे. याच सिनेमाच्या नावाचा आधार घेत विरोधकांनी चक्क सरकारला ठग असे म्हणत युतीच्या सरकारने कसे चार वर्षांत सर्वसामान्यांना ठगवले अशी बॅनरबाजी करत ठग ऑफ महाराष्ट्रचे टायटल देत विरोधकांनी ठगबाजीची चार वर्षे दाखवली आहेत. त्यामुळे अधिवेशनात देखील या पिक्चरच्या नावावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होणार तेही तितकेच खरे.

काय दाखवलय फलकातून

यावेळी विरोधकांनी ठग्स ऑफ महाराष्ट्र ठगबाजीची चार वर्षे म्हणत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांनी सरकारला शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमती, मराठा, मुस्लिम,धनगर आरक्षण, सामाजिक प्रश्न, शिवस्मारक, मुंबई विद्यापीठाचा कारभार, स्मार्टसिटी आणि रोजगारासारख्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न

उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठक सुरू असून, या बैठकीत सरकारला घेरण्यासाठी विरोधक मनसुबे आखत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -