घरमहाराष्ट्रतोपर्यंत मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही - रामदास आठवले

तोपर्यंत मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही – रामदास आठवले

Subscribe

मराठा आरक्षण राज्य सरकार देईलच, मात्र ते कोर्टात टिकू शकणार नाही, त्यासाठी रामदास आठवले यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच सोडविणार आहेत. मात्र मराठा समाजाला कितीही टक्के आरक्षण देणारा निर्णय सरकारने घेतला तरी तो न्यायालयात टिकू शकत नाही. आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांपर्यंत निर्धारित केली असल्याने त्यापेक्षा अधिक आरक्षण दिले जाऊ शकत नाही.  त्यावर उपाय म्हणून संसदेत आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविणारा कायदा करणे आवश्यक आहे. तोपर्यंत मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे राज्यात मराठा समाजाला; गुजरात मध्ये पटेल; हरियाणा मध्ये जाट आणि राजस्थानात गुज्जर आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळेल, अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. घाटकोपर पूर्व येथील आचार्य अत्रे मैदानात रिपाइं ईशान्य मुंबई जिल्ह्यातर्फे आयोजित संविधान शक्ती मेळाव्यात आठवले बोलत होते.

काँग्रेसचा चेहरा सेक्युलर, अंतर्मनाने जातीवादी पक्ष

काँग्रेसने दलित मुस्लिमांच्या पाठिंब्यावर ६० वर्षे  देशाची सत्ता उपभोगली मात्र दलित मुस्लिमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. गरीब झोपडीवासीयांना न्याय दिला नाही. दलितांवरील अत्याचार रोखले नाहीत. काँग्रेस भाजपवर जातीवादी असल्याचा आरोप करीत आहे, मात्र खरा जातीवादी पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसचा चेहरा सेक्युलर असला तरी अंतर्मनातून काँग्रेसच खरा जातीवादी पक्ष आहे, अशी टीका आठवले यांनी केली आहे.

- Advertisement -

संविधान बदलणे, सरकार बदलण्याइतके सोपे नाही

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी संविधान बदलले जाऊ शकत नाही. संविधानाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष वाटेल ती कुर्बानी देऊन संविधानाला हात लागू देणार नाही”, असा ईशाराही आठवले यांनी दिला. काँग्रेसला चांगले माहीत आहे की संविधान बदलले जाऊ शकत नाही तरी संविधान बदलणार असा खोटा; खोडसाळ प्रचार ते करीत आहेत. संविधान  बदलणे हे सरकार बदलण्यासारखे सोपे नाही. सरकार बदलणे सोपे मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार कोणी बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी हे संविधानाचा गौरव करणारे प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदींसारखा चहा विकणारा मुलगा या देशाचा प्रधानमंत्री झाला ही संविधानाचिच शक्ती असल्याचे आठवले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -