Coronavirus – मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र बंद!

Coronavirus – मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र बंद!

होय ! एकदम सेफ

करोनाच्या तिसर्‍या स्टेजच्या करोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यात वृत्तपत्र वृत्तपत्र न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे. त्यामुळे मुंबई लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भाजीपाला, दूध, औषधे, किराणा माल, इतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालू राहतील. तसेच वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील.

त्यामुळे ग्राहकांशी होणारा संपर्क टाळण्यासाठी वृत्तपत्र वितरक संघटनेने वृत्तपत्र न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई –ठाण्यातील नागरिकांना ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र मिळणार नाहीये.

लॉकडाऊमध्ये काय होईल?

* औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू राहतील. धान्याची आवक, बँका सुरू राहतील.

* महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.

* रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद पूर्णपणे बंद.

* जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील.

* शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.

* सर्व जगातून मुंबई महाराष्ट्रात येणारी विमाने बंद.

* ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व ज्यांच्या हातावर शिक्केे आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

* ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

* सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरू राहील; पण भाविकांसाठी प्रवेश बंद असेल.

First Published on: March 23, 2020 8:30 AM
Exit mobile version