मुंबईच्या ‘या’ परिसरात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ

मुंबईच्या ‘या’ परिसरात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ

मुंबईसह (Mumbai) आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona Virus) डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या उच्चभ्रु वस्ती (Mumbai High Class Settlement) कोरोनाची हॉट स्पॉट (Hot Spot) असल्याचे पालिकेकडून (BMC) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अंधेरी पश्चिम, ग्रॅण्ड रोड, वांद्रे पश्चिम, या उच्चभ्रु भागात कोरोनाचे रूग्ण सर्वाधिक सापडत असल्याची माहिती मिळते. (Corona patients Increased In Mumbai High Class Area)

या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. मात्र एकीकडे नागरिकांचे दोन्हा लसीकरण पूर्ण झाले असले, तरी दुसरीकडे पुन्हा कोरोनाचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासन व सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनामुळे राज्याचे आरोग्य विभाग (Department of Health) आणि पोलिस प्रशासनही दास्तावले आहेत.

हेही वाचा – यंदाची वारी कोरोना निर्बंधमुक्त असणार, राज्य सरकारचा वारकऱ्यांना दिलासा

मागील अनेक दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढायला लागल्याने आरोग्याची काळजी घ्या, तसेच मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यास तात्काळ नवी नियमावली लागू करणार असल्याचेही मंत्र्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अंधेरीमध्ये ५८४ रूग्ण आहेत. दक्षिण मुंबईच्या ग्रॅण्ट रोड परिसरात ४०० च्या आरपास रूग्णसंख्या, वांद्रे भागात ३५० रूग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील उच्चभ्रु वस्ती कोरोनाची हॉट स्पॉट बनली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. शिवाय, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचे आणि सामजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आले आहेत.


हेही वाचा – राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ

First Published on: June 7, 2022 8:16 AM
Exit mobile version