Corona Vaccine: आता खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस

Corona Vaccine: आता खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स लस दिली जात आहे. काही दिवसानंतर तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या मोहीम सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सरकारी रुग्णालयात कोरोना लस दिली जात होती. पण आता खासगी रुग्णालयात देखील कोरोना लस दिली जाणार आहे. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयाने लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापालिकेला सुचित केलं आहे. त्याअनुशंगाने मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयाची यादी तयार केली आहे. यामध्ये लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, वेटिंग रुम, ऑब्जर्वेशन रुम आणि तातडीच्या सुविधा देणारी यंत्रणा असेल, अशा खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील सूचना महापालिकेला पाठविल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीमेच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे सध्या यासंदर्भात आराखडा तयार केला जात आहे. यामुळे खासगी रुग्णालयात यापुढे कोरोनाची लस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची नोंदणी १ मार्चपासून सुरू होणार – राजेश टोपे


 

First Published on: February 11, 2021 5:38 PM
Exit mobile version