मातोश्री उडवून देण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हे शाखेचा तपास सुरू; गृहमंत्र्यांची माहिती

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हे शाखेचा तपास सुरू; गृहमंत्र्यांची माहिती

छाया - दीपक साळवी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. हे प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी तसेच यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिली.

काय आहे प्रकरण 

शिवसेना पक्ष स्थापन करणारे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेले मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येत आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, असे म्हटले आहे.

हेही वाचा –

महापालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ‘ते’ ५० लाख मिळालेच नाहीत!

First Published on: September 6, 2020 9:08 PM
Exit mobile version