गेल्या ५ वर्षात ९८ टक्क्यांनी वाढला डेंग्यू

गेल्या ५ वर्षात ९८ टक्क्यांनी वाढला डेंग्यू

प्रातिनिधिक फोटो

गेल्या पाच वर्षांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सुमारे ९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ७ हजार २६१ वरुन ही संख्या १४ हजार ३४५ वर पोहोचली आहे. मलेरिया आणि डेंग्यूची आकडेवारी जाणून घेण्यासाठी प्रजा फांऊडेशन आणि हंसा रिसर्चकडून मुंबईतील २० हजार ७८ घरांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला. तेव्हा ही धक्कादायक आकडेवारी उजेडात आली. मलेरियाचीही ११ हजार १६३ प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबईतील ७६ टक्के घरांमध्ये कोणाचाही विमा काढण्यात आला नसल्याचेही या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०१३ – १४ मध्ये टीबीच्या रुग्णांची संख्या ३३ टक्क्यांनी वाढली आहे. ४१ हजार ४७९ या संख्येवरुन २०१७ -१८ मध्ये ५५ हजार १३० एवढी झाली. २०१७ -१८ टीबीचे एल वॉर्डमध्ये ७९२, एच ई ६१४ तर, एच भांडुप ४९६ आढळले आहेत. तसेच, मुंबईकरांचा २०१८ मध्ये एकूण वार्षिक उत्पन्नाच्या ९.१ टक्के खर्च हॉस्पिटल,वैद्यकीय उपचारांवर झाला आहे. म्हणजे साधारण एकूण घरांनी २४ हजार ७६६ कोटी रुपये हॉस्पिटल, वैद्यकीय उपचारांवर खर्च केल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले.

मनपा व सरकारी हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांचा तुटवडा

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३९ टक्के तर १७४ डिसपेंसरीजमध्ये केलेल्या सर्व्हेत २१ टक्के स्टाफची कमतरता आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये जवळपास ५९ टक्के स्टाफ कमी आहे. मुंबईतील संसर्गजन्य रोगांचा बिमोड करण्यासाठी सरकारी योजना आणि धोरणे पुरेशी नाहीत. एकीकडे शहराचे आरोग्य स्पष्टपणे ढासळत असताना आपली प्राधिकरणे जागरूक नाहीत आणि या परिस्थितीला ते जबाबदार आहेत असेही त्यांना वाटत नाही. सरकारी दवाखाने, हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांचा तुटवडा असणे गंभीर बाब असल्याचे कुणाच्याही लक्षात येत नाही, असे
प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के म्हणाले.

First Published on: September 8, 2018 2:46 AM
Exit mobile version