देवेन भारती हे पीटर, इंद्राणीला मुखर्जीला ओळखत होते – राकेश मारिया

देवेन भारती हे पीटर, इंद्राणीला मुखर्जीला ओळखत होते – राकेश मारिया

राकेश मारिया देवेन भारती

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मकथेत एक खळबळजनक दावा केला आहे. २०१५ च्या शीना बोरा हत्याकांडाच्या चौकशीत तत्कालीन सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती हे आरोपी पीटर मुखर्जी आणि त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना ओळखत असल्याची माहिती सुरूवातीला लपवली होती. तसेच संपुर्ण प्रकरणावरून झालेल्या बदलीबाबतही त्यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

डावीकडून देवेन भारती आणि राकेश मारिया

शीना बोरा हत्याकांडात पीटर मुखर्जीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले अधिकारी राकिया मारिया यांनी अखेर आपल मन एका पुस्तकाच्या माध्यमातून मोकळे केले आहे. पीटर मुखर्जी यांच्यावर पूर्व पत्नी इंद्राणी मुखर्जीची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप आहे.

शीना बोरा हत्याकांडाची मोठी चर्चा २०१५ मध्ये सुरू झाली होती. मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीला अटक करून २०१२ मध्ये झालेल्या शीनाच्या हत्येचा आरोप तिच्यावर ठेवला होता. खार पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया हे या प्रकरणात सक्रीय होते. त्यावेळी इंद्राणी पाठोपाठ त्यांनी पीटर मुखर्जी यांचीही चौकशी केली होती.

पण शीना बोरा हत्याकांड चर्चेत असतानाच राकेश मारिया यांची बदली करण्यात आली. त्यांना होमगार्ड विभागाच्या महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शीना बोरा हत्याकांडात अधिक रस घेतल्यानेच त्यांची बदली महाराष्ट्र सरकारमार्फत झाली अशी चर्चा त्यावेळी झाली. खुद्द देवेंद्र फडणवीसही या प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर खुश नव्हते. कारण सुरूवातीला त्यांनी पीटर मुखर्जी यांच्याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. पण काही दिवसांनंतर मात्र हे प्रकरण राज्य सरकारने सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवले.

राकेश मारिया यांनी लिहिलेल्या Let Me Say It Now या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलघडा केला आहे. मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्याने आपल्याला महत्वपूर्ण माहितीपासून अंधारात ठेवले असा गौप्यस्फोट राकेश मारिया यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चुकीची माहिती पुरवली गेल्याचा आरोप राकेश मारिया यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आपल्या पुस्तकातून राकेश मारिया यांनी या माहितीचे खंडन केले आहे. काही माध्यमांनीच पीटर मुखर्जी या हत्याकांडात सामील नसल्याच्या बातम्या दिल्या होत्या.

तपासादरम्यान पीटर मुखर्जी भारतात नव्हता
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात राकेश मारिया आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ एकदाच बोलण झाले. पीटर मुखर्जी हे शीना बोराची हत्या झाली तेव्हा भारतात नव्हती. मात्र त्यांचा या हत्याकांडात समावेश आहे का याची चौकशी होत असल्याचे त्यांनी फडणवीस यांना सांगितले होते. राकेश मारिया यांनी केलेल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांना मॅसेज करून सांगितले होते.

राकेश मारिया यांच्याशी संबंधित काही वादाची प्रकरणे संपुष्टात आणण्यासाठीच त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाकडून बदली करण्यात आल्याचेही त्यावेळी बोलले गेले. पण त्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पीटर मुखर्जी या प्रकरणात थेट संबंधित नाहीत असे सांगून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. म्हणूनच ही बढती देण्यात आल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्री आणि राकेश मारिया यांच्यातील गैरसमजामुळे ही बढती देण्यात आली असेही पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. तत्कालीन अतिरिक्त मु्ख्य सचिव के पी बक्शी यांच्याकडे माध्यमांसोबत बोलण्याची परवानगी राकेश मारिया यांनी मागितली होती. पण या गोष्टीवर बक्शी यांनी कधीच स्पष्ट उत्तर दिले नाही असेही राकेश मारिया नमुद केले आहे.

देवेन भारती यांनीही मांडली बाजू
मारिया यांच्या संपुर्ण परिवाराची बॉलिवुडशी जवळीक आहे. त्यामुळे स्क्रिप्ट रायटर्सचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्याशिवाय ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याचे प्रतिउत्तरही देवेन भारती यांनी दिले आहे.

First Published on: February 18, 2020 10:18 AM
Exit mobile version