महिला डॉक्टरच्या मुलीची आत्महत्या

महिला डॉक्टरच्या मुलीची आत्महत्या

कल्याणमधील खडकपाडा या ठिकाणी एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकादा महिला डॉक्टरच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शर्मिष्ठा सोम असे या तरुणीचे नाव असून तणावाखाली असल्यामुळे तिने ही आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नेमके काय घडले?

ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट इमारतीत सोम कुटुंब राहतं. आज सकाळी कावेरी सोम यांची मुलगी शर्मिष्ठा सोम यांनी एव्हरेस्ट इमारतीच्या १२ व्या मजल्याावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. शर्मिष्ठा या एबीबीएस असून तणावाखाली असल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर केवळ अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली येऊन आत्महत्याचे पाऊल उचल्याचंही सूत्रांनी सांगितले आहे.


वाचा – कल्याणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या


 

First Published on: January 5, 2019 1:10 PM
Exit mobile version