घरमुंबईकल्याणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या

कल्याणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या

Subscribe

कल्याणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

कल्याणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी असे या विवाहीतेचे नाव आहे. इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरगुती वादातून या महिलेने आत्मत्या केली असावी असा प्यारथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

कल्याणमधील खडकपाडा या ठिकाणी राहणारी महिला डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांने इमारतीच्या गच्चीवरुन सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉ. प्राजक्ता यांचे पत्ती देखील डॉक्टर आहेत. डॉ. प्रणव कुलकर्णी यांच्याशी डॉ. प्राजक्ता यांचा विवाह झाला होता. गेल्या आठ वर्षांपासून सासू-सारे आणि दोन मुलांसोबत हे दोघेही महावीर हाइट्स सोसायटीत राहत आहेत. घरगुती वादातून महिला डॉक्टरनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्रथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत इमारतीच्या रहिवाशांना विचारले असता याप्रकरणाविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. प्रत्येकांने बोलण्यास विरोध केला आहे. मात्र डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी उडी मारल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असल्यामुळे ही माहिती समोर आली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – डोंबिवलीत दोन तरुणींची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -