धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीची केली हत्या

धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीची केली हत्या

Refuses to marry: Attempt to kill a young woman

पत्नीने मोबाईल दिला नाही म्हणून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे. पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने नशेत असलेल्या नवऱ्याने पत्नीला चाकून भोसकून तिची निर्घृण हत्या केली आहे. जेम्स कुर्रेया (५१) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

चेंबूरच्या म्हाडा कॉलनीत जेम्स जॉन कुर्रेया हा दारुच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी पत्नी राबिया हिच्याकडे फोन मागितला. त्यावर तिने फोन देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जेम्सने राबिया यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेला आणि जेम्सने किचनमध्ये जाऊन धारदार चाकू आणला आणि राबियावर सपासप वार करत तिला ठार केले. राबिया हिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, शेजारचे वाचवण्यसाठी येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास केल्यानंतर जेम्स याचा हा दुसरा विवाह असल्याचे उघडकीस आले. जेम्सची पहिली पत्नी ही मानखुर्द येथे राहते तर राबिया ही दुसरी पत्नी होती.


हेही वाचा – मराठी येत नसल्यामुळे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीचा शिवसेनेकडून अपमान


First Published on: March 9, 2020 8:29 PM
Exit mobile version