घरताज्या घडामोडीमराठी येत नसल्यामुळे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीचा शिवसेनेकडून अपमान

मराठी येत नसल्यामुळे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीचा शिवसेनेकडून अपमान

Subscribe

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते या मुलीचा शिवसेना नेत्यांनी अपमान केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या झेनचा सत्कार सोहळा संपन्न झाला. सत्कारानंतर इंग्रजीत भाषण करत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी आडकाठी करत आपल्या हातातला माईक हिसकावून घेतला असल्याचा आरोप झेनने केला आहे.

२२ ऑगस्ट २०१८ साली मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता, तर अठरा लोक जखमी झाले होते. या आगीत धाडस दाखवत १० वर्षीय झेनने अनेकांचे प्राण वाचवले होते. तिच्या या धाडसासाठी तिला यावर्षी २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्याहस्ते शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. झेन सदावर्ते मुंबईची असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने तिचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. मात्र सत्कारावेळी वेगळाच प्रसंग घडला.

- Advertisement -

झेन सदावर्ते भाषण करत असताना तिने देशातील सद्यस्थितीवर बोलायला सुरुवात केली. शनिवार आणि रविवार असताना सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात नाही, तसेच तृतीयपंथीयांना दिलेल्या समांतर आरक्षणाबद्दलचे विषय तिने मांडले होते. मात्र झेनच्या इंग्रजी आणि तिच्या बोलण्याच्या शैलीवरुन आयोजकांनी तिला मध्येच थांबवले. मात्र तरिही झेन आणखी मोट्या आवाजात बोलायला लागली. त्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्याने झेनच्या हातातील माईक काढून घेतला. तसेच तू महाराष्ट्रात असताना मराठीतच बोलले पाहीजे, असेही सांगितले.

- Advertisement -

कार्यक्रमात बोलायला संधी नाकारल्यानंतर झेनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कार्यक्रमाच्या आयोजकांनी गदा आणली आहे. मला कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. हिंदी आणि इंग्रजी या राष्ट्रीय भाषा आहेत. इथे राहायचे असेल तर मराठी आले पाहीजे, या शब्दात मला धमकाविण्यात आले. पण मला कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार ते नाकारू शकत नाहीत, असेही यावेळी झेन म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -