असल्या धमक्यांना भीक घालत नाही, एकनाथ शिंदेंचे अरविंद सावंत यांना उत्तर

असल्या धमक्यांना भीक घालत नाही, एकनाथ शिंदेंचे अरविंद सावंत यांना उत्तर

अरवींद सावत यांनी शिष्टमंडळासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी विधीमंडळ उपाध्यक्षांकडे केल्याचे सांगितले. ते बंडखोर आमदार पक्षाच्या विधीमंडळ बैठकीला गैरहजर राहील्यामुळे ही कारवाई करावी, अशी पीटीशन दाखल केल्याची मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करू याला उत्तर दिले आहे.

यावर कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे ट्विट केले आहे.

सदस्यत्व रद्द करण्याची मागणी झालेले 12 आमदार –

एकनाथ शिंदे (कोपरी)

तानाजी सावंत (भूम-परंडा)

संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)

संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

अब्दुल सत्तार (सिल्लोड)

भरत गोगावले (महाड)

प्रकाश सुर्वे (मागाठाणे)

अनिल बाबर (सांगली)

बालाजी किनीकर (अंबरनाथ)

यामिनी जाधव (भायखळा)

लता सोनावणे (चोपडा)

महेश शिंदे (कोरेगाव)

First Published on: June 23, 2022 10:44 PM
Exit mobile version